मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींचा भाजपात प्रवेश !

तीन महिन्यांपूर्वीच झाले होते निवृत्त

मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींचा भाजपात प्रवेश !

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहित आर्य यांनी शनिवारी(१४ जुलै) भाजपमध्ये प्रवेश केला. न्यायमूर्ती आर्य तीन महिन्यांपूर्वी निवृत्त झाले होते. भोपाळ येथील पक्ष कार्यालयात एका कार्यक्रमादरम्यान भाजपच्या मध्य प्रदेश युनिटचे अध्यक्ष राघवेंद्र शर्मा यांनी त्यांना सदस्यत्व दिले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्लाही उपस्थित होते.

न्यायमूर्ती आर्य यांनी १९८४ मध्ये वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. २००३ मध्ये त्यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी केंद्र सरकार, एसबीआय, दूरसंचार विभाग, बीएसएनएल आणि आयकर विभागासाठी खटलेही लढवले आहेत. २०१३ मध्ये त्यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यात आले आणि २०१५ मध्ये त्यांनी स्थायी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायमूर्ती आर्य हे २७ एप्रिल २०२४ रोजी निवृत्त झाले होते.

हे ही वाचा:

पुण्यात ‘झिका’चा वाढता प्रादुर्भाव; २३ जणांना लागण

आषाढी एकादशीपूर्वीच वारकऱ्यांना सरकारकडून भेट; पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार पेन्शन

१५ तासांहून अधिक काळापासून कोकण रेल्वे ठप्प! प्रवासी रेल्वे स्थानकात अडकले

१२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्पेनने इंग्लडला नमवत युरो चॅम्पियनशिप जिंकली

मुनावर फारुकीला जामीन देण्यास नकार
न्यायमूर्ती आर्य हे तेच माजी न्यायाधीश आहेत ज्यांनी कॉमेडियन मुनावर फारुकी आणि नलिन यादव यांना जामीन देण्यास नकार दिला होता. मुनावर फारुकीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होता. सद्भाव आणि बंधुता वाढवणे हे प्रत्येक नागरिकाचे घटनात्मक कर्तव्य असल्याचे न्यायमूर्ती आर्य यांनी त्यावेळी म्हटले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मुनावर फारुकी यांना जामीन मंजूर केला होता.

Exit mobile version