माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात दिलासा नाही!

न्यायालयीन कोठडीत रवानगी

माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात दिलासा नाही!

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाने हा निकाल दिला.हेमंत सोरेन यांना २२ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात होते.

हेमंत सोरेन यांना आज विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना २२ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आम्ही त्याच्यासाठी जामीन याचिका दाखल करू, असे माजी मुख्यमंत्र्यांची बाजू मांडणारे ऍडव्होकेट जनरल राजीव रंजन म्हणाले.

हे ही वाचा:

हवामानाचा अचूक अंदाज मिळणार; इस्रोकडून अत्याधुनिक उपग्रहाचे प्रक्षेपण

फारुख अब्दुल्ला यांनी इंडी आघाडीची साथ सोडली, स्वबळावर निवडणूक लढवणार!

कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका

इम्रान खानच्या पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर

दरम्यान, कोर्टातून सोरेन यांना रांचीच्या होटवार येथील बिरसा मुंडा सेंट्रल जेलमध्ये बदली करण्यात आली आहे.हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारीला ईडीकडून अटक करण्यात आली होती.त्यांनतर ते ईडीच्या ताब्यात होते.न्यायालयाने सुरुवातीला पाच दिवसांची ईडी कोठडी मंजूर केली होती.त्यानंतर दोनदा एकूण सात सात दिवसांसाठी मुदत वाढवण्यात आली.

 

Exit mobile version