झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. झामुमोचा राजीनामा दिल्यानंतर चंपाई सोरेन शुक्रवारी (३० ऑगस्ट) भाजपमध्ये सामील झाले. रांची येथे एका समारंभात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या उपस्थितीत सोरेन आणि त्यांच्या मोठ्या संख्येने समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
चंपाई सोरेन यांनी २८ ऑगस्ट रोजी जेएमएमच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ट्वीटकरत त्यांनी याबाबत माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी चंपाई सोरेन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीचे फोटो आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शेअर करत चंपाई सोरेन ३० ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. यापूर्वी ते स्वतः स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची माहिती होती, मात्र मंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. अखेर चंपाई सोरेन यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘शिवरायांच्या चरणावर डोके ठेवून माफी मागतो’
आंध्रमधील महाविद्यालयात मुलींच्या वसतिगृहातील वॉशरूममध्ये कॅमेरा; ३०० हून अधिक छायाचित्रे लीक
“वाढवण बंदरामुळे पुढील ५० वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहणार”
काँग्रेसच्या भूपेंद्र सिंह हुड्डांवर ईडीची कारवाई, ८३४ कोटींची मालमत्ता जप्त!
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चंपाई सोरेन म्हणाले, राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, झारखंडमधील लोकांचे प्रेम आणि पाठिंबा यामुळे मी राजकारणातून निवृत्ती न घेण्याचा निर्णय घेतला. मी झारखंड आंदोलनादरम्यानचा संघर्ष पाहिला आहे. मला वाटले की मी नवीन पक्ष सुरू करेन किंवा दुसऱ्या पक्षात जाईन, परंतु मी त्या संघटनेत कधीही राहणार नाही जिथे मला लाज वाटली. झारखंडच्या लोकांची सेवा करत राहण्यासाठी मी एका पक्षात (भाजप) सामील होण्याचा निर्णय घेतला, असे चंपाई सोरेन यांनी म्हटले.