नागालँडचे माजी राज्यपाल असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांचे शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.’पीबी’ म्हणून प्रसिद्ध असलेले आचार्य यांनी त्यांच्या मुंबईतल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.आज संध्याकाळी त्यांच्यावर मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांनी स्वयंसेवक संघ (आरएसएस) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपची सेवा केली होती. मार्गारेट अल्वा यांच्यानंतर राज्यपालपदासाठी निवड झालेले बालकृष्ण आचार्य हे जिएसबी समुदायातून पहिले तर कर्नाटकातील दुसरे व्यक्ती होते.
हे ही वाचा:
ससूनमधील पंचतारांकित सुविधांसाठी ललित पाटील मोजत होता १७ लाख रुपये
अमेरिकन गायिका मिलबेनने नीतिशकुमारना सुनावले!
बिहारमध्ये आता ६५ टक्के आरक्षण!
मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे का? म्हणत मराठा तरुणाची आत्महत्या
आचार्य हे एमजीएम कॉलेजच्या पहिल्या बॅचचे (१९४८-५०) विद्यार्थी होते. त्यांनी शहरातील कडबेट्टू येथील आरएसएस विद्यारण्य युनिटचे प्रमुख म्हणून काम केले होते. आरएसएसचे सक्रिय कार्यकर्ते असलेले आचार्य यांना १९४८ मध्ये आरएसएसवर बंदी घातल्यानंतर सरकारने सहा महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात ठेवले होते.१९९५ ते २००१ दरम्यान नरेंद्र मोदी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करत असताना त्यांनी भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून काम केले होते.
आचार्य यांनी नागालँड, त्रिपुरा, आसामचे राज्यपाल म्हणून काम केले होते तसेच मणिपूर, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.