माजी परराष्ट्र मंत्री एस एम कृष्णा यांचे निधन

२००४ ते २००८ साली महाराष्ट्राचे राज्यपाल होते

माजी परराष्ट्र मंत्री एस एम कृष्णा यांचे निधन

माजी परराष्ट्र मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सोमनहल्ली मैल्लया कृष्णा यांचे मंगळवार, १० डिसेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी कृष्णा यांनी पहाटे २.४५ वाजता बंगळूरू येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव आज महूर येथे नेण्यात येणार आहे. एस एम कृष्णा हे पूर्वी दीर्घकाळ काँग्रेसमध्ये होते त्यानंतर ते भारतीय जनता पार्तीसोबत जोडले गेले.

माहितीनुसार, एस एम कृष्णा हे काही दिवसांपासून आजारी होते. ऑक्टोबरमध्येही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली. एस. एम कृष्णा यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रेमा, दोन मुली शांभवी आणि मालविका आहेत. त्यांनी गेल्या वर्षीच सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती.

गेली सहा दशके ते राजकीय क्षेत्रात होते. त्यांच्या कामाची म्हणून एस. एम. कृष्णा यांना २०२३ मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. आपल्या साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, मुख्यमंत्री, राज्यपाल या पदांसह अनेक महत्त्वाची सार्वजनिक पदं भुषवली होती.

हे ही वाचा:

‘जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्या’ला फडणवीसांनी का केला फोन?

‘हिंदूंवरील हल्ल्यांमुळे भारत चिंतेत’

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘विमा सखी योजने’चे उद्घाटन!

मोदीजी, बॉर्डरचे गेट उघडा, १५ मिनिटांत बांगलादेश स्वच्छ करू!

एस. एम कृष्णा यांचा राजकीय प्रवास १९६० च्या दशकात सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी अपक्ष म्हणून मद्दूर विधानसभेची जागा जिंकली. त्यानंतर ते प्रजा सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावरही जिंकले. १९६८ मध्ये एस. एम. कृष्णा हे मंड्या या मतदारसंघातून खासदार झाले. अत्यंत अल्प कालावधीत १९६८ ते १९७० आणि १९७१ ते ७२ अशा कालावधीत ते दोनदा खासदार झाले. पुढे त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली. १९७२ ते ७७ या कालावधीत ते आमदार झाले. १९७२ मध्ये देवराज उर्स मंत्रिमंडळात एस. एम. कृष्णा वाणिज्य उद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री होते. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (KPCC) अध्यक्ष म्हणून १९९९ मध्ये त्यांनी पक्षाला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचीही सूत्रं स्वीकारली. २००४ ते २००८ या काळात ते महाराष्ट्राचे राज्यपालही होते. २००९ ते २०१२ या कालावधीत ते परराष्ट्र मंत्रीही होते.

Exit mobile version