पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांचे निधन

वयाच्या ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांचे निधन

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. देबरॉय यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली होती. बिबेक देबरॉय यांनी गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलपतीपदाचा सप्टेंबरमध्ये राजीनामा दिला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून देबरॉय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. डॉ. बिबेक देबरॉय हे एक उत्तुंग विद्वान होते. अर्थशास्त्र, इतिहास, संस्कृती, राजकारण, अध्यात्म आणि बऱ्याच विविध क्षेत्रांमध्ये पारंगत होते. आपल्या कार्यातून त्यांनी अमिट छाप सोडली. सार्वजनिक धोरणातील त्यांच्या योगदानाच्या पलीकडे, त्यांनी प्राचीन ग्रंथांवर काम केले, ज्यामुळे ते तरुणांसाठी सुलभ झाले, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

दीपोत्सवाला विरोध करणाऱ्या ठाकरे गटाने ईदसाठीच्या हिरव्या कंदिलाला विरोध केला असता का?

छत्रपती संभाजी नगरमध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त

“भारत आपल्या सीमेच्या एक इंच भागाचीही तडजोड करू शकत नाही”

मनोज जरांगेंची तुलना थेट गांधी आणि आंबेडकारांशी

१९५५ साली देबरॉय यांचा जन्म झाला. त्यांनी कोलकाता शहरातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर राजधानी दिल्लीतल्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून तसेच ट्रिनिटी महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. जागतिकीकरणानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत धोरणं ठरवताना देबरॉय यांचा सिंहाचा वाटा होता. नीती आयोगाचे सदस्य राहिलेल्या देबरॉय यांनी रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी पाठपुरावा केला. त्यांनी केलेल्या सूचना अंमलात आणल्यामुळेच भारतीय रेल्वे हा उपक्रम हा जगातल्या सर्वोत्तम अशा सार्वजनिक वाहतूक उपक्रमांपैकी एक होऊ शकला. देशाच्या शाश्वत विकासाला हातभार लागेल या दृष्टिकोनातून विदाकेंद्रित धोरणं आखण्यात त्यांचा हातखंडा होता. देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक साक्षरतेचं महत्त्व कळावं यासाठीही त्यांनी सातत्याने काम केलं.

Exit mobile version