27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषमाजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी ‘एम्स’मध्ये !

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी ‘एम्स’मध्ये !

युरोलॉजी विभागात उपचार सुरू; प्रकृती स्थिर

Google News Follow

Related

देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयातील खासगी वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. एम्सचे युरोलॉजी विभागाचे प्रोफेसर डॉ. अमलेश सेठ त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांची नियमित तपासणी सुरू आहे. तसेच, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. वयोमानाशी संबंधित आजारांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लालकृष्ण अडवाणी हे भाजपच्या सर्वांत ज्येष्ठ नेत्यांपैकी एक नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या दिग्गज नेत्यांनी अडवाणी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान अडवाणी हे सोफ्यावर बसल्याचे दिसले होते.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये अवैध प्रवाशांना बनावट आधार कार्ड आणि ओळखपत्रे!

केजरीवालांना सीबीआय कोठडीत भगवद्गीता बाळगण्याची परवानगी

ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत बार, पब्सवर बुलडोझर फिरवण्याचे निर्देश

चांद्रयान- ४ चंद्रावर पोहचण्यापूर्वीच रचणार इतिहास; यानाचे भाग दोन प्रक्षेपणांद्वारे कक्षेत पाठवणार

लालकृष्ण अडवाणी यांना ३० मार्च रोजी भारतरत्नने सन्मानित करण्यात आले होते. अडवाणी यांचे वयोमान आणि बिघडत्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणी यांच्या निवासस्थानी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता. या प्रसंगी उपराष्ट्रपती जगदीश धनखड आणि माजी उपराष्ट्रपीत एम. व्यंकय्या नायडू हेदेखील उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा