24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषमाजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार ‘भारतरत्न’ जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच त्यांनी आडवाणी यांचे अभिनंदनही केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कारची घोषणा करताना म्हटले आहे की, “मला कळवायला अतिशय आनंद होत आहे. लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासंदर्भात त्यांच्याशीही बोललो आहे. हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. ते आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांनी भारताच्या विकासात अविस्मरणीय योगदान दिले आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचे समर्पण महत्त्वाचे आहे. त्यांनी गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. संसदेतील त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे.”

काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनाही भारतरत्न सन्मान जाहीर करण्यात आला. राष्ट्रपती भवनातून याबाबत निवेदन जारी करण्यात आले होते. कर्पूरी ठाकूर यांच्या १०० व्या जयंतीआधी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.

लालकृष्ण आडवाणी यांचा जीवनप्रवास

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी झाला. ते भारतीय जनसंघाचे नेते होते आणि १९७४ साली ते राज्यसभेवर निवडून गेले. आणीबाणीच्या वेळी त्यांनी तुरुंगवास भोगला. १९७७ साली जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले. १९८० साली भारतीय पक्षाची स्थापना झाली आणि लालकृष्ण अडवाणी हे त्याच्या संस्थापकांपैकी एक नेते होते.

हे ही वाचा:

राम मंदिराला ११ दिवसांत ११ कोटी रुपयांची देणगी

मालदीवमधून १० मेपर्यंत भारतीय सैनिक मायदेशी परतणार

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिवसेना नेत्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार

दादरचा महात्मा गांधी जलतरण तलाव गुदमरतोय

१९९८ साली भाजपाची सत्ता आल्यानंतर ते देशाचे गृहमंत्री झाले. तर पुढे २००२ ते २००४ या कालावधीत ते देशाचे उपपंतप्रधान होते. १९८६ ते १९९०, १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. लालकृष्ण अडवाणी सध्या भाजपच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा