दिल्ली सरकारमध्ये मंत्री राहिलेले आणि आम आदमी पक्षाला रामराम ठोकलेल्या राजकुमार आनंद यांनी आज (१० जुलै) बसपाची साथ सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकुमार आनंद यांनी मंत्री पदाचा राजीनामा देऊन बसपामध्ये सामील झाले होते. याशिवाय आपचे छतरपूरचे आमदार करतार सिंह तंवर आणि आपचे नगरसेवक उमेद सिंह फोगट यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
माजी आमदार वीणा आनंद, आप नेते रत्नेश गुप्ता आणि सचिन राय यांनी देखील आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह आणि दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थित पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
हेही वाचा :
राहुल द्रविड म्हणाला, मला ५ कोटी नको, अडीच कोटीच द्या!
ऑस्ट्रियात पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी वाजले ‘वंदे मातरम’
वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाची मोठी कारवाई, राजेश शाहांची पक्षातून हकालपट्टी!
वरळी हिट अँड रन प्रकरणी बारवर हातोडा!
राजकुमार आनंद यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसपाच्या तिकिटावर नवी दिल्लीतून निवडणूक लढवली होती. मात्र, या जागेवरून भाजपचे बन्सुरी स्वराज विजयी झाले होते. राजकुमार आनंद दिल्ली सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री होते. दिल्ली सरकारला अनुसूचित जातीविरोधी म्हणत त्यांनी मंत्रीपदासह आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला आणि आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.