30 C
Mumbai
Monday, April 28, 2025
घरविशेषउबाठात बिघाडी एकनाथ शिंदेंकडे घाडी

उबाठात बिघाडी एकनाथ शिंदेंकडे घाडी

महापालिका निवडणुकीपूर्वी उबाठा गटाला जोरदार धक्का

Google News Follow

Related

उबाठा गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि उबाठाच्या उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, व मागाठाणे विधानसभेतील अनेक उप शाखाप्रमुख, गट प्रमुख, शाखाध्यक्ष आणि युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज (१३ एप्रिल) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे उपस्थित होत्या. पक्ष प्रवेशाने महापालिका निवडणुकीपूर्वी उबाठा गटाला जोरदार धक्का बसला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील अडीच वर्षात सर्वसामान्यांना सोन्याचे दिवस आणण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून केले. एकीकडे विकास प्रकल्प आणि दुसरीकडे लोकाभिमुख योजना या दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न सरकारने केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या निवडणुकीत ८० जागा लढवून ६० जागा जिंकलो तर कोणी १०० जागा लढवून २० जागा जिंकल्या, यावरुन खरी शिवसेना कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. त्यांच्या आरोपाला आरोपातून नाही तर कामातून उत्तर दिले.

हे ही वाचा  : 

…तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचा पर्याय

४८ तासांच्या आत वक्फ कायदा रद्द करू!

‘हिंदूंची कत्तल होतेय आणि खासदार युसूफ पठाण चहाचा आनंद घेतोय!’

८५० बैल आणि ३५० बुलफायटर्सचा पराक्रम बघा

बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते, सत्ता जाते पण नाव जाता कामा नये, ते नाव टिकवण्याचे काम आपण केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकाऱण या विचारानुसार आपले सरकार काम करतेय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मुंबईत १५ ते २० वर्षांपूर्वी जी कामे व्हायला हवी होती ती आपण मागील अडीच वर्षात सुरु केली. मुंबईत अटल सेतु, कोस्टल रोड झाला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची विमा सुरक्षा १.५ लाखांवरुन ५ लाख केली. हे काम करणारे सरकार आहे. ही काम करणारी शिवसेना आहे. धनुष्यबाण ही आपली निशाणी आहे. धनुष्यबाण आणि भगवा झेंडा हे आपले इमान, श्वास आणि आपला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले.

शिंदे यांनी केलेल्या कामाने प्रभावित होत मूळ शिवसेनेत प्रवेश केला असे माजी नगरसेवक संजय घाडी यांनी यावेळी सांगितले. तर संजना घाडी यांची शिवसेनेच्या उपनेते आणि प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
245,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा