तेलूगू देसम पार्टीचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एन टी रामाराव (NTR) यांची मुलगी के उमा माहेश्वरी (६० वर्षे) यांनी सोमवार, १ ऑगस्ट रोजी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. उमा माहेश्वरी या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या आणि गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. हैदराबादमधील त्यांच्या ज्युबली हिल्स येथील निवासस्थानी त्या काल मृतावस्थेत आढळून आल्या. माहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
एन टी रामाराव यांच्या १२ मुलांपैकी माहेश्वरी या सर्वात लहान होत्या. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची त्या मेहुणी होत्या. मेहुणी माहेश्वरी यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच चंद्राबाबू नायडू तसेच त्यांचा मुलगा नारा लोकेश आणि कुटुंबातील इतर सदस्य उमा माहेश्वरी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
हे ही वाचा:
रोकड प्रकरणी झारखंडच्या तीन काँग्रेस आमदारांवर झाली ‘ही’ कारवाई
कुणाला नको आहे संभाजीनगर, धाराशिव नामकरण?
संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख
शिवीगाळप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या
उमा माहेश्वरी जुबली हिल्स येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या पतीसोबत वास्तव्याला होत्या. त्यांचा मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासणीनुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या नैराश्यात गेल्या होत्या. त्यामुळे माहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याचा संशय असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.