शिया वक्फ बोर्ड माजी अध्यक्षांनी स्वीकारला हिंदू धर्म…वाचा सविस्तर

शिया वक्फ बोर्ड माजी अध्यक्षांनी स्वीकारला हिंदू धर्म…वाचा सविस्तर

कोर्टात सुरू असलेला खटला, सतत येणाऱ्या धमक्या यामुळे इस्लामचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय शिया वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी घेतला. त्यांनी आता हिंदू धर्म स्वीकारला असून त्यांनी नवे नावही धारण केले आहे.

शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी हे इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. ‘न्यूज १८ लोकमत’ने दिलेल्या माहितीनुसार रिझवी हे आज गाझियाबादमधील दसना देवी मंदिरात हिंदू धर्म स्वीकारला. दसना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद गिरी महाराज त्यांचे धर्मपरिवर्तन केले. यती नरसिंहानंद गिरी महाराज हे रिझवी यांना संपूर्ण विधींसह हिंदू धर्मात विलीन केले. हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर त्यांचे नाव हरबीर नारायण सिंह त्यागी असे असेल.

वसीम रिझवी यांनी काही दिवसांपूर्वी मृत्यूपत्र जारी केले होते. मृत्यूनंतर मला दफन करू नये, तर हिंदू रितीरिवाजांनुसार माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत, असे मृत्युपत्रात नमूद केले होते. यती नरसिंहानंद यांनी माझ्या चितेला अग्नी द्यावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.

हे ही वाचा:

राजांनी मांडलेली ‘युगत’ प्रेक्षकांच्या पसंतीस

भारताच्या संविधानाचा मसुदा ज्यावर टाईप केला त्या टाईपरायटरचे होणार जतन

संरक्षण करारासाठी पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लिखाण अजरामर

रिझवी यांनी त्यांना ठार मारण्याचा आणि शिरच्छेद करण्याचा कट रचला जात असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. माझा गुन्हा एवढाच आहे की, मी कुराणातील २६ आयतांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर मुस्लिमांना मला मारायचे आहे आणि त्यांनी मला कोणत्याही कब्रस्तानात जागा देणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यामुळे मी मेल्यानंतर माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत, असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले होते.

कुराणातील २६ आयती काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली होती. तेव्हापासून कट्टरपंथी मुस्लीम अनेकदा वसीम रिझवी यांना लक्ष्य करत असतात. रिझवी यांचा इस्लाम आणि शिया समाजाशी काहीही संबंध नसल्याचेही मुस्लीम संघटनांचे म्हणणे आहे. मुस्लिम संघटना रिझवी यांचे मुस्लिमविरोधी संघटनांचे एजंट म्हणून वर्णन करतात.

Exit mobile version