जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान महेंद्र मोरे यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. गोळीबाराची घटना घडल्यानंतर महेंद्र मोरे यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ते उपचारांना साथ देत नव्हते म्हणून त्यांना नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली.
चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी असलेल्या कार्यालयात ७ फेब्रुवारी रोजी महेंद्र मोरे बसलेले असताना त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. अज्ञात इसमांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात महेंद्र मोरे हे गंभीरित्या जखमी झाले होते. या प्रकरणात चाळीसगाव शहर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. या गोळीबारासाठी वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. फक्त पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याच सांगण्यात येत आहे. चाळीसागाव पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी विविध पथके तयार केली आहेत.
हे ही वाचा:
अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणातल्या मॉरीसने म्हणून नेमला अंगरक्षक
काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना मिळणार ९० हजार पगार!
उत्तराखंडनंतर बरेलीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती, जमावाकडून दगडफेक!
जाडेजाचे वडील म्हणतात, त्याला क्रिकेटर केले नसतं तर बरं झालं असतं
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर भाजपा आमदाराने गोळीबार केल्याची घटना घडली होती. तर, दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाइव्ह दरम्यान मॉरिस नावाच्या आरोपीने गोळीबार करून हत्या केली.