माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी आज रविवार ( २४ मार्च )भाजपमध्ये प्रवेश केला आहे.तसेच वायएसआर काँग्रेस पार्टी नेते वरप्रसाद राव वेलागापल्ली यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वरप्रसाद राव वेल्लापल्ली म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश केल्याचा मला अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे त्यांनी कौतुक केले.माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की, मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतातील लोकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि सैन्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचे आहे.मोदीजींचे अद्भूत नेतृत्व विकसित भारत बनविण्यात मदत करेल, असे आरकेएस भदौरिया म्हणाले.
दोघांच्या पक्ष प्रवेशावर केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की, माजी एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया आणि वारा प्रसाद राव यांचे जगातील सर्वात मोठ्या पार्टीत स्वागत आहे. भदौरियाजींना गणवेशात पाहून खूप प्रेरणा मिळत असल्याचे मंत्री अनुरागसिंह ठाकूर म्हणाले.
हे ही वाचा :
केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवू लागले!
पापुआ न्यू गिनीमध्ये शक्तिशाली भूकंप!
आयएसआयएसमध्ये सहभागी होण्यासाठी जाणारा आयआयटी गुवाहाटीचा विद्यार्थी ताब्यात!
कोलकात्याचा हैदराबादवर थरारक विजय!
दरम्यान, एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांना लोकसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.त्यांना गाझियाबाद किंवा फिरोजाबाद मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बनवले जाऊ शकते. कारण पश्चिम उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि मेरठ या जागांसाठी भाजपने अद्याप आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत.
आरकेएस भदौरिया यांची २०१९ ते २०२१ पर्यंत हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. भदौरिया हे मूळचे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील कोरथ गावचे रहिवासी आहेत. त्यांनी १ ऑक्टोबर २०१९ रोजी भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता.भदौरिया यांनी भारतीय हवाई दलात ४० वर्षे काम केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेनेच राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्याचे एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी सांगितले.