नैनीतालमध्ये वणवे पेटून जंगलांचे नुकसान; आयटीआय भवन जळालं

नैनीतालमध्ये वणवे पेटून जंगलांचे नुकसान; आयटीआय भवन जळालं

उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. जंगलात वणवे भडकत असून, नैनीतालपासून जवळ असलेल्या नैनीताल भवाली रोडवर पाईन्सच्या जंगलात भीषण आग लागली आहे. यामुळे जंगलात मोठे नुकसान होत असून ही आग आता शहरी भागाजवळ पोहचली आहे.

नैनीतालपासून जवळ असलेल्या नैनीताल भवाली रोडवर पाईन्सच्या जंगलात भीषण आग लागली असून त्यामुळे जंगलातील एका मोठ्या भागाबरोबरच आयटीआय भवन जळालं आहे. नैनीतालमधीस लडियाकांटा क्षेत्रातील जंगलातही वणवा पेटला आहे. या भीषण वणव्यांमुळे नैनीताल येथून भवाली येथे जाणाऱ्या रस्त्यावर धुराचे लोट आले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

शिवाय आग लागलेल्या भागात वारे मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. नैनीतालजवळील लडियाकांटा येथे लागलेली आग लष्कराच्या ताब्यात असलेल्या भागांपर्यंत पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे लष्कराच्या जवानांकडूनही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाकडून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नैनीताल आणि भीमताल येथील तलावांमधून पाणी नेऊन हा वणवा शमवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हे ही वाचा:

मनी लाँडरिंग प्रकरणात नाव गुंतल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी महिलेकडून २५ कोटी लुबाडले

समाजवादी काँग्रेसला मार्क्सवादाचे वळण

वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीवर काँग्रेस नेते नसीम खान नाराज; स्टार प्रचारक पदाचा राजीनामा

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला फटका

यादरम्यान, नैनीताल जिल्हा मुख्यालयाजवळ लागलेल्या आगीने अधिकच भीषण रूप धारण केले आहे. त्यामुळे पाईन्स भागात असलेल्या हायकोर्ट कॉलनीतील रहिवासी भागाला धोका निर्माण झाला आहे. मात्र या वणव्यामुळे हायकोर्ट कॉलनीमध्ये अद्याप कुठलेही नुकसान झालेले नाही.नैनीतालसह कुमाऊंच्या जंगलांमध्येही आग लागली आहे. नैनीतालच्या बलदियाखान, खुरपाताल, ज्योलिकोट, मंगोली, देवीधुरा, भवाली, पाईनस, भीमताल मुक्तेश्वर अशा आजूबाजूच्या जंगलांमध्येही वणवे पेटले आहेत.

Exit mobile version