फणसाडच्या अभयारण्यात परदेशी गिधाडांचे ‘रेस्टॉरन्ट’

परदेशी पाहुण्यांचे कोकणातील अभयारण्यात 'एन्ट्री'

फणसाडच्या अभयारण्यात परदेशी गिधाडांचे ‘रेस्टॉरन्ट’

हिवाळ्यामध्ये थंडीची चाहूल लागताच महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात पक्षी स्थलांतरित होत असतात. यामध्ये पक्षी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका देशातून दुसऱ्या देशात पक्षी स्थलांतरित होत असतात. आता अशीच एक घटना महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा तालुक्यादरम्यान फणसाड वन्यजीव अभयारण्य घडली आहे. या अभयारण्यमध्ये गिधाडांच्या संवर्धनासाठी वनविभागाने गेल्या वर्षी एक उपक्रम राबवला असून, त्यामध्ये गिधाडांसाठी मेजवानी असते. अशीच मेजवणीची चव चाखण्यासाठी परदेशातून पाहुणे भारतात आले आहेत. त्यामध्ये इजिप्तच्या सोनेरी रंगाची व काळ्या मानेची गिधाडे दिसून आले, असे वनअधिकाऱ्यांनी सांगितले.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल लागताच खाडी व समुद्रकिनारी परदेशी पक्षी स्थलांतरित होत असतात. मात्र यावेळी प्रथमतच कोकणातील रायगड जिल्ह्यामधील फणसाड अभयारण्यात परदेशी गिधाडे दिसून आले आहेत. कारण गेल्यावर्षी सुपेगाव परिसरातील फणसाड वन्यजीव अभयारण्यामध्ये ‘व्हल्चर रेस्टॉरंट’ उभारण्यात आले होते. त्यामध्ये अभयारण्यातील वनधिकारी व वनरक्षक मुरुड तालुक्यांसाह अन्य परिसरातील मूत जनावरे आणून टाकतात. तसेच जनवारांचे मास हे गिधाडांचे प्रमुख अन्न आहे. ते खाण्यासाठी गिधाडे या परिसरात येतात.

हे ही वाचा:

शिवसेनेसाठी १० वेळा तुरुंगात जायला तयार

अभिनेता अंकुर वाढवे झाला ही परीक्षा उत्तीर्ण

अफझलखानाच्या मृत्यूदिनीच त्याच्या कबरीभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

अडवाणी, जोशी आणि उमा भारती यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळली

मात्र या उपक्रमामुळे आता इजिप्तमधील सोनेरी रंगाची व काळ्या मानेची गिधाडांनी आपला मोर्चा फणसाड अभयारण्यात वळवला असून, ‘व्हल्चर रेस्टॉरंट’ मध्ये ताव मारताना दिसून आले आहेत. अशी माहिती सहायक वनरक्षक नंदकिशोर कुप्ते यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच जनावरांचे मास हे गिधाडांचे प्रमुख खाद्य पदार्थ असून, सध्या गिधाडांचे प्रमाणही कमी होत चालले आहे. त्याचप्रमाणे गिधाडांचे संवर्धन होणे ही काळाची गरज बनली आहे. याच हेतूने फणसाड अभयारण्यात ‘व्हल्चर रेस्टॉरंट’ ही संकल्पना राबवण्यात आली आहे.

Exit mobile version