27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषगुजरातमध्ये वसतिगृहाच्या परिसरात नमाज पढणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला!

गुजरातमध्ये वसतिगृहाच्या परिसरात नमाज पढणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला!

गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Google News Follow

Related

अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठात रमजानची नमाज अदा करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.हल्लेखोरांनी वसतिगृहाच्या खोल्यांचीही तोडफोड केली आणि घोषणाबाजी आणि दगडफेक देखील केली आहे.नमाज पठण करणारे हे विद्यार्थी ताजिकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे विद्यार्थी अहमदाबादमधील वसतिगृहाच्या परिसरात नमाज अदा करत होते.त्यामुळे संतप्त झालेल्या काही विद्यार्थ्यांनी याला विरोध केला, त्यानंतर हे प्रकरण हाणामारीत पोहचले.

शनिवारी( १६ मार्च) वसतिगृहाच्या ए ब्लॉक आवारात हा हल्ला झाला.वसतिगृहात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की, ब्लॉक बी वसतिगृहातील काही विद्यार्थी आले आणि वसतिगृहाच्या आवारात कुठेही रमजानची नमाज अदा करू नये, असे त्यांनी आम्हाला सांगितले.ते पुढे म्हणाले की, सुरवातील आम्हाला रोखण्यासाठी तीन जण पुढे आले, त्यानंतर १५ जण आले आणि बघता-बघता ही संख्या २०० च्या वर गेली.जखमी विद्यार्थ्यांना अहमदाबादच्या एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी शाहजहान शेखच्या भावाला अटक

पंतप्रधानांनी ईडीला दिली शाबासकी, भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईबद्दल कौतुक

हत्या झालेला पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या आईने लहान मुलाला दिला जन्म!

मथुरेत लव्ह जिहाद; हिंदू असल्याचे भासवून हिंदू मुलीला प्रेमपाशात ओढले; गर्भवती झाल्यानंतर सोडले!

 

अहमदाबाद पोलिसांनी सांगितले की, “गुजरात विद्यापीठ कॅम्पसमध्ये काल रात्री, इतर देशांतील राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आणि तोडफोड केली, या दुर्घटनेत हे विद्यार्थी जखमी झाले आहेत.पोलिसांनी ताबडतोब पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, गृहमंत्री हर्ष संघवी यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा