गाझामध्ये अडकलेल्या नागरिकांचा पहिला गट रशियात दाखल

३३५हून अधिक पासपोर्टधारक नागरिकांनी केला प्रवेश

गाझामध्ये अडकलेल्या नागरिकांचा पहिला गट रशियात दाखल

गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्याविरोधात संघर्ष सुरू असतानाच गाझामध्ये अडकलेले परदेशी नागरिक आणि जखमींची सुटका करण्याची मोहीम सुरू झाली आहे. कतारच्या मध्यस्थीमुळे झालेल्या तडजोडीनुसार, नागरिकांचा पहिला गट बुधवारी रशियात दाखल झाला. पॅलिस्टिनी सीमा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारपर्यंत ३३५हून अधिक परदेशी पासपोर्टधारक नागरिकांनी राफा सीमेवरून रशियामध्ये प्रवेश केला. युद्धग्रस्त गाझामधून सुटका झालेल्या लोकांमध्ये किमान ३२० विदेशी पासपोर्टधारक आणि डझनभर गंभीर जखमी गाझावासींचाही समावेश आहे.

रशियात दाखल झालेले हे नागरिक युद्ध सुरू झाल्यानंतर गाझामध्ये अडकले होते. अमेरिकी पासपोर्टधारक डॉ. फाथी अबू अल हसन यांनी गाझामध्ये अन्न-पाणी-निवाऱ्याअभावी दयनीय अवस्था झाल्याचे सांगितले. गाझामध्ये जिकडे पाहावे तिथे प्रेते दिसतात, असेही ते म्हणाले. इस्रायलच्या सैन्याने गाझा पट्टीवर बुधवारी जोरदार बॉम्बवर्षाव केला. त्यांनी आणखी आत घुसून हमासचे तळ उद्ध्वस्त केले. बुधवारी इंटरनेट आणि फोनसेवा अनेक तास खंडित होती. गाझा शहरातून २० लाखांहून अधिक लोक आपली घरे सोडून निघून गेले आहेत.

हे ही वाचा:

‘एकमेकांशी मोकळ्या मनाने संवाद साधून अढी दूर करा’!

शिवाजी पार्क प्राणी संग्रहालयातून प्राणी झाले गायब!

‘गाझामधील हल्ला म्हणजे तालिबानी मानसिकतेला चिरडणे’

दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी जबालिया येथील गाझाच्या सर्वांत मोठ्या निर्वासितांच्या शिबिरात मोठा स्फोट झाला. एक दिवसापूर्वीच इस्रायलने जबालिया येथे केलेल्या हवाई हल्ल्यात ५० जण मारले गेले होते. यात हमासचा एक कमांडर मारला गेल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

 

इस्रायल आणि हमासच्या युद्धात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत या युद्धात आठ हजार ८००हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुसंख्य महिला आणि लहान मुले असल्याची माहिती गाझा पट्टीच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.

Exit mobile version