विवाहासाठी ग्रीसच्या पेनेलोपने निवडले प्रयागराज, महाकुंभात सिद्धार्थसोबत घेतली सप्तपदी!

महामंडलेश्वर यतिंद्रानंद गिरी यांनी केले कन्यादान

विवाहासाठी ग्रीसच्या पेनेलोपने निवडले प्रयागराज, महाकुंभात सिद्धार्थसोबत घेतली सप्तपदी!

प्रयागराजमधील महाकुंभाची जगभरात चर्चा असून परदेशातील नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. याच दरम्यान, एका अनोख्या विवाहामुळे महाकुंभाची जोरदार चर्चा होत आहे. ग्रीसमधील पेनेलोप आणि भारतातील सिद्धार्थ शिव खन्ना या दोघांनी महाकुंभात लग्न केले आहे. दोघांनीही हिंदू रितीरिवाजानुसार सात फेरे घेतले. साधू आणि संत लग्नाचे पाहुणे बनले आणि जुना आखाड्याचे महामंडलेश्वर यतिंद्रानंद गिरी यांनी वधूचे कन्यादान केले.

२६ जानेवारी रोजी दोघांचा लग्न सोहळा पार पडला. लग्न सोहळ्यानंतर ग्रीसची पेनेलोप म्हणाली, सनातन धर्म हा आनंदी जीवन जगण्याचा आणि जन्म आणि पुनर्जन्माच्या या चक्राच्या पलीकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. मला इतका आनंद आहे की मी तो व्यक्त करू शकत नाही. आमचे लग्न आध्यात्मिक पद्धतीने झाले आहे. मौनी अमावस्येला मी संगमात स्नान करणार आहे, असे पेनेलोप यांनी सांगितले.

पेनेलोप ही अथेन्समधील एका विद्यापीठातून पर्यटन व्यवस्थापनात पदवीधर आहे. तर, सिद्धार्थ शिव खन्ना अनेक देशांमध्ये जाऊन योग शिकवतो. यामधून त्यांची ओळख झाली, ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले आणि लग्नाचा निर्णय घेतला. सिद्धार्थ शिव खन्ना हा नवी दिल्लीतील पश्चिम पंजाबी बाग येथील रहिवासी आहे.

हे ही वाचा : 

विलो चीपमुळे क्रांती घडणार!

सैफ हल्ला प्रकरणी पश्चिम बंगालमधून एका महिलेला अटक!

पंजाबमध्ये आंबेडकर पुतळा तोडफोड प्रकरण: या अपमानाला केजरीवाल जबाबदार!

महाकुंभ: गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगींनी केले संगमात स्नान!

पेनेलोप पुढे म्हणाली, जेव्हा सिद्धार्थने मला विचारले की मी भारतात लग्न करावे की ग्रीसमध्ये, तेव्हा मी भारत निवडला. गेल्या काही वर्षांत गोष्टी बदलल्या आहेत. आजकाल, लग्नांमध्ये दारू पिणे हा एक ट्रेंड बनला आहे, परंतु आमचे लग्न एका वेगळ्या, दैवी आणि आध्यात्मिक पद्धतीने झाले. मी यापूर्वी कधीही भारतीय लग्नाला उपस्थित राहिली नाही, पण एक वधू म्हणून, मी भारतीय लग्नाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मला ते खूप आवडले.

सिद्धार्थ म्हणाला, सर्वात प्रामाणिक पद्धतीने लग्न करण्याचे मी ठरवले होते. प्रयागराज सध्या त्याच्या दिव्य स्वरूपासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण आहे. सर्व प्रकारचे देवत्व, तीर्थक्षेत्रे, सर्वकाही येथे आहे. आम्ही महाराजांना (स्वामी यतिंद्रानंद गिरी) भेटलो. मला त्यांचे आशीर्वाद मिळाले. आम्ही दोघेही ७ जन्मांच्या बंधनात बांधले गेलो.

 

महाकुंभाचा विचार करण्यास हिंदू समर्थ आहे, तुम्ही खतना, हलालावर बोला | Dinesh Kanji | Mahakumbh 2025

Exit mobile version