चिनी सैन्य सीमेवर गुंडगिरीसाठी उभे आहे, मात्र त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर ठामपणे आहे, असे विधान संरक्षण सचिव गिरिधर अरमाने यांनी केले. भारत आणि चीनच्या लष्करादरम्यान नुकत्याच झालेल्या चर्चेच्या फेरीत भारताने आक्रमक भूमिका घेऊनही चीनने पूर्व लडाखमधील देपसांग आणि डेमचॉक या भागातून लष्कर मागे घेतलेले नाही.
दुसऱ्या इंडक्स-एक्स संरक्षण परिषदेत आरमाने यांनी माहिती दिली. अमेरिका इंडो-पॅसिफिक कमांड प्रमुख ऍडमिरल ज़न अक्विलिने हे अमेरिकेच्या वतीने यात सहभागी झाले आहेत. ‘मे२०२०मध्ये लडाखच्या पूर्व भागात चीनशी उडालेल्या संघर्षादरम्यान अमेरिका सरकारने तातडीने गेलेल्या मदतीबाबत आरमाणे यांनी अमेरिकेचे आभार मानले. अमेरिकेने दिलेल्या गुप्तचर संस्थांच्या माहितीचा आणि अन्य उपकरणांचा आम्हाला चांगला उपयोग झाला, असे त्यांनी सांगितले.
चीनच्या पीपल लिबरेशन आर्मीचे सशस्तर ५० ते ६० हजार जवानांचे सैन्य पश्चिम (लडाख) आणि मध्य भाग (उत्तराखंड आणि हिमाचल) येथील वास्तविक नियंत्रण रेषेच्या तीन हजार ४८८ किमी लांब सीमेवर तैनात केले आहे. तर, सिक्कीम, अरुणचाल या पूर्वेकडील भागात ९० हजार सैनिक तैनात आहेत, अशी माहिती सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली. भारतानेही त्यानंतर त्यांच्यासमोरच लष्कर तैनात केले होते. त्याबाबतच आरमाणे यांनी ही प्रतिक्रिया दिली. सीमेवरून लष्कराने माघार घ्यावी, अशी भारताने केलेली विनंती चीनने फेटाळली.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निवासस्थानी सीबीआयची छापेमारी
ईडीकडून बायजूसचे संस्थापक रवींद्रन यांच्या विरोधात लुकआउट नोटीस
“विरोधकांनी टीका करण्यापेक्षा निर्णय चुकीचा कसा हे दाखवावे”
संदेशाखाली प्रकरणी अटक केलेल्या तृणमूल नेत्यावर आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल!
‘भारत आपल्या शेजारी देशाशी(चीन) सर्व आघाड्यांवर तोंड देत आहे. जिथे जिथे डोंगराळ भाग येतात, तिथे आम्हाला त्यांचा सामना करावा लागतो. जेव्हा रस्ता येतो, तेव्हाही आम्हाला सज्ज राहावे लागते. त्यामुळे आम्हाला अशा प्रकारच्या गुंडगिरीविरोधात ठामपणे उभे राहतो,’ असे ते म्हणाले. अशा प्रसंगी आम्हाला मदत लागल्यास आमचा मित्र अमेरिका आमच्यासोबत असेल, अशी आशा आम्ही करतो. हे आमच्यासाठी आवश्यक आहे आणि आम्ही ते एकत्र केले पाहिजे. अशा वेळी आम्हाला पाठिंबा देण्याकरिता आमच्या मित्रांनी दिलेल्या समर्थनाबद्दल आभार व्यक्त करतो.
सामायिक धोक्याचा सामना करताना आम्ही एकमेकांना पाठिंबा देऊ, हा दृढ संकल्प आमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे,’ असे आमराणे म्हणाले. ‘अमेरिकेने भारताला आपल्या इंडो-पॅसिफिक रणनीतीत एक प्रमुख भागीदार म्हणून पाहिले आहे आणि भारताच्या वाढत्या संरक्षण क्षमतेचा फायदा घेतला आहे,” ते म्हणाले. संपूर्ण इंडो-पॅसिफिकमध्ये चीनच्या आक्रमक आणि विस्तारवादी वर्तनाच्या पार्श्वभूमीवर, मग तो दक्षिण आणि पूर्व चीन समुद्र असो किंवा भारतासोबतच्या भू-सीमा असो, भारत आणि अमेरिका या प्रदेशात वेगवेगळ्या पातळ्यांवर सहकार्य करत आहेत, असे अरमाने म्हणाले.