एनएसएस शिबिरात हिंदू विद्यार्थ्यांना नमाज पढण्याची केली गेली सक्ती!

छत्तीसगड विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचा आरोप, कारवाईची मागणी

एनएसएस शिबिरात हिंदू विद्यार्थ्यांना नमाज पढण्याची केली गेली सक्ती!

छत्तीसगडच्या बिलासपुरमधील गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोठा आरोप केला आहे. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) शिबिरादरम्यान हिंदूंना जबरदस्तीने नमाज पठण करण्यास भाग पडल्याचा आरोप हिंदू विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून कार्यक्रम अधिकारी, समन्वयक आणि शिबिरात सहभागी असलेल्या इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या गंभीर आरोपानंतर छत्तीसगड पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहे.

याबाबत माहिती देताना विद्यार्थ्याने सांगितले की, गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाद्वारे २६ मार्च ते १ एप्रिल असे सात दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिवतराई जंगलात चाललेल्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) शिबिरात एकूण १५९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या दरम्यान, ३० मार्च रोजी ईद-उल-फित्रच्या दिवशी समन्वयकाने चार मुस्लिम विद्यार्थ्यांना स्टेजवर नमाज पठण करण्यास आमंत्रित केले आणि नंतर हिंदू विद्यार्थ्यांना सामील होण्यास आणि नमाज पठण करण्यास भाग पाडले.

यासाठी आमच्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याविरुद्ध आम्ही आवाज उठवला तेव्हा त्यांनी आम्हाला भीती दाखवली आणि धमकावले गेले. विद्यार्थ्यांनी असा दावा केला की, एनएसएस समन्वयक आणि कार्यक्रम अधिकाऱ्याने याला धार्मिक सौहार्दाचे प्रतीक म्हटले आणि उपस्थिती अनिवार्य केली. ज्यांनी विरोध केला त्यांना त्यांची प्रमाणपत्रे दिली जाणार नाहीत अशी धमकी देण्यात आली.

शिबिरातील १५९ विद्यार्थ्यांपैकी फक्त चार मुस्लिम विद्यार्थी होते, तर उर्वरित हिंदू होते. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल करत कार्यक्रम अधिकारी डॉ. बसंत कुमार आणि समन्वयक दिलीप झा आणि शिबिरात सहभागी असलेल्या इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा : 

गुगलकडून भारतातील २९ लाख जाहिरातदारांची खाती निलंबित; कारण काय?

“तो पुन्हा येतोय… वेगाचा कहर घेऊन!”

शूटिंग : सुरुचीनं मनुला मागे टाकत सलग दोन जागतिक सुवर्णपदकं पटकावली!

‘कोच, मी खेळेन’ – आणि त्या एका वाक्यानं सगळं बदललं!

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर एसएसपी रजनेश सिंह म्हणाले, या प्रकरणी चौकशी सुरु आहे आणि चौकशीत कोणी दोषी आढळले तर कारवाई केली जाईल. ते पुढे म्हणाले, विद्यापीठ व्यवस्थापनाने आम्हाला आश्वासन दिले आहे की त्यांनी याची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे, जी २४ तासांच्या आत आपला अहवाल सादर करेल.

प्रियांका चतुर्वेदींचा उबाठाला टाटा बायबाय? | Mahesh Vichare | Priyanka Chaturvedi | NCP | Shivsena

Exit mobile version