25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषगेली ५० वर्षे दोरखंडाच्या सहाय्याने ते उतरतात ४० फूट खोल विहिरीत

गेली ५० वर्षे दोरखंडाच्या सहाय्याने ते उतरतात ४० फूट खोल विहिरीत

१४ वर्षांचा दिनेश वळवी हा १० वर्षांचा असल्यापासून विहिरीत उतरत आहे

Google News Follow

Related

४० वर्षीय मोल्या वळवीने विहिरीत उतरताना दोरखंडावर आपली पकड घट्ट केली आणि त्याने खडकांत साचलेले पाणी भरून घेतले. तब्बल ४० फूट खोल तो उतरला होता. त्याला श्वास घेताना त्रास होत होता. उष्म्याने आणखी बिकट अवस्था केली होती. परंतु पाणी घेतल्याशिवाय वर यायचे नाही, हा त्याचा निर्धार कायम होता. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील देब्रामल हे वळवीचे गाव. एका ओबडधोबड टेकडीवर वसलेले हे गाव. सातपुडा पर्वतरांगांच्या उतारापलीकडून नर्मदा नदीचे विहंगम दृश्य दिसते. ही नदी जवळ दिसत असली तरी ती तशी नाही. त्याचे पाणी तर त्यांच्यासाठी दिवास्वप्नच. म्हणून तर गेली पाच दशके उन्हाळा आला की त्यांना विहिरीत तब्बल ४० फूट उतरण्याची कसरत करावी लागते. मार्च महिना आला की पाणीटंचाईची झळ बसू लागते.

देब्रामलमधील किमान ५० कुटुंबातील एक किंवा दोन व्यक्ती विहिरीवर दोर टाकून तळाशी साचलेले गढूळ पाणी काढण्यासाठी जुंपलेले असतात. पूर्वी विहीर अरुंद असायची, आता ती रुंद झाली आहे. आणि विहिरीत उतरणाऱ्या एका ‘आरोहकां’ची पिढी जाऊन त्यांची जागा दुसऱ्यांनी घेतली आहे. पाण्याची समस्या मात्र कायम आहे. सध्या ११ ते ५० वयोगटातील किमान ५० जण दोरखंडावरून विहिरीत उतरून पाणी घेतात. एकतर तहानलेले राहायचे किंवा खोल, कोरड्या विहिरीतून तासन् तास पाणी काढून थकायचे… हे दोनच पर्याय गावकऱ्यांसमोर आहेत. हे गावकरी दुसरा पर्याय निवडतात. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

खेत्या वळवी सांगतात, ‘मी माझ्या वडिलांना विहिरीत जाताना पाहिले आहे. अनेक वर्षांपासून हेच आमचे आयुष्य राहिले आहे आणि आता खरे सांगायचे तर आम्हालाही याची सवय झाली आहे.’ विहिरीत उतरण्यापूर्वी खेत्याला सज्ज राहावे लागते. आधी तो विहिरीच्या भिंतीवर आडवा होतो. नंतर स्वत:ला विहिरीत उतरवण्यासाठी तो दोरखंड पकडतो. सुमारे पाच फूट खाली उतरल्यावर काळोखाची दाटी होते. विहिरीच्या टोकदार भिंतींवरून उडी मारताना त्याला होणाऱ्या संवेदनाच त्याच्या मार्गदर्शक होतात. जेव्हा तो तळाशी पोहोचतो, तेव्हा एलईडीच्या झगमगत्या प्रकाशात पाणी जमा करण्यासाठी तो जवळपास तासभर थांबतो. एकदा त्याच्या बादल्या भरल्या की, नातेवाईक त्या खेचतो आणि त्या भरण्यासाठी पुन्हा विहिरीत टाकतो. बादल्या पूर्ण भरल्या घेतल्या की खेत्या वर येतो. पण तोपर्यंत खेत्या खूप थकलेला असतो. मात्र त्याला थकून चालणार नसते, कारण हे पाणी त्याला त्याच्या झोपडीपर्यंत वाहून न्यायचे असते. त्यासाठी त्याला किमान तासभर पायपीट करणे भाग असते.

हे ही वाचा:

‘बिपरजॉय’मुळे ६७ रेल्वे गाड्या रद्द!

‘जाहिरातीमध्ये न पडता डबल इंजिन सरकारचं काम जनतेपर्यंत पोहोचवणं आवश्यक’

आनंद महिंद्रांनी नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

जी- २० परिषदेसाठी आलेले परदेशी पाहुणे वारीत दंग

१४ वर्षांचा दिनेश वळवी हा १० वर्षांचा असल्यापासून विहिरीत उतरत आहे. ‘हे तुमच्या ताकदीवर अवलंबून आहे. काही जण त्यांच्या पायाचा वापर करतात. तर, मी माझ्या हातांचा वापर करतो. १० वर्षांची मुले सहज खाली जातात पण वर चढणे अवघड असते आणि काहीवेळा ते बादलीत बसतात आणि वर खेचले जातात. मी उत्तमप्रकारे विहिरीत चढू आणि उतरू शकतो,’असे तो सांगतो. देब्रामलमध्ये महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक परिवर्तन मोहिमेंतर्गत विकास होणार होता. ‘सन २०१७मध्ये एक दिवस सरकारी अधिकारी येथे सर्वेक्षणासाठी आले आणि आम्हाला आमचे गाव एका योजनेखाली आहे, असे सांगून ते आमच्यासाठी एक टाकी बांधतील आणि आमची पाण्याची समस्या दूर होईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते,” असे एका गावकऱ्याने सांगितले.

पाण्याची टाकी, १७ हातपंप आणि दोन विहिरी गावांत आहेत, पण त्यात पाणी नाही. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी या अडचणींबाबत माहिती दिली. ‘आम्ही जिल्हा परिषद आणि पेसा निधीतून देब्रामलसाठी काही योजना सुरू केल्या, परंतु येथील भौगोलिक रचनेमुळे येथे फारच कमी भूजल होते. ही एक तांत्रिक समस्या आहे. आता, जल जीवन मिशन अंतर्गत, आम्ही अशा अनेक गावांचे सर्वेक्षण करत आहोत आणि दीर्घकालीन उपाय शोधणार आहोत,’ असे त्या सांगतात.

रात्री गारवा झाल्यावर विहिरीच्या तळापर्यंत जाण्याची शर्यत अधिक कठोर असते. स्त्रिया आणि मुलांसह अनेक कुटुंबे रांगेत त्यांची जागा पकडण्याच्या गडबडीत असतात. ‘मार्चपासून आम्ही रोज विहिरीजवळ झोपतो. आम्ही असे नाही केले तर आमचा नंबर चुकतो. आम्ही नेहमी कडक उन्हात पाणी आणू शकत नाही. या विहिरीवर जवळपास ४० कुटुंबे अवलंबून आहेत,” असे धीरसिंग वळवी (२५) सांगतात.

वाट पाहणारी कुटुंबे आणि त्यांची विहीर चढणारे पथक रांगेतच झोपी जातात, नंतर त्यांच्या वाट्याचे पाणी घेतात आणि घरची वाट चालू लागतात. १४ वर्षांचा आकाश वळवी हा देखील विहिरीत उतरतो. तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर, सकाळी त्याच्या कुटुंबाचा नंबर लागतो. तो काही सेकंदातच विहिरीच्या तळाशी असतो. एकदा त्याने त्याची बादल्या जमा केल्या की तो भिंतीवर पाय ठेवतो आणि पटकन स्वत:ला वर खेचतो. “तुम्ही थकले असाल तरीही, तुम्हाला एका झटक्यात वेगाने चढावे लागते. जर तुम्ही वेग कमी केला किंवा थांबलात, तर तुम्हाला पुढे चढणे कठीण होते,’ असे आकाश सांगतो.

ज्यांना विहिरीत उतरता येत नाही किंवा जे हा त्रास सहन करू शकत नाहीत, ते दुसऱ्या गावातून पाणी आणण्यासाठी तीन तासांची पायपीट करतात. ११वीत शिकणारा राहुल पाडवी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी घरी असला ती त्याचा बराचसा वेळ विहिरीतच जातो. “विहिरीत असताना कधी कधी श्वास घुसमटतो आणि वर चढताही येत नाही. मात्र त्यावेळी एखादी छोटीशी चूकही महागात पडू शकते. जराशी पकड सैल झाली तर माणूस खाली कोसळूलाच म्हणून समजा. आमच्यासाठी हे सायकल चालवण्यासारखे आहे. गावातील प्रत्येकजण हे करू शकतो, अगदी स्त्रिया आणि लहान मुलंही,” असे तो सांगतो.

गेल्या वर्षी शिरीष वळवी नुकताच ११ वर्षांचा झाला होता, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला बादलीत टाकलं आणि विहिरीत उतरवलं. काही फूट आत गेल्यावर तो घाबरला आणि मोठ्याने ओरडला. माझ्या अनुपस्थितीत, कुटुंबासाठी पाणी कसे आणायचे, हे शिरीषला माहीत असलेच पाहिजे, याची पुरेपूर जाण वडिलांना होती. त्यामुळे यावर्षी शिरीष या कामासाठी सज्ज झाला आहे. देब्रामलच्या गावकऱ्यांमध्ये आणखी एक नवीन विहीर चढणारा सामील झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा