आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा मुंबई गुणतक्त्यात तळाला

आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा मुंबई गुणतक्त्यात तळाला

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईचा लखनऊने आणखी एक लाजिरवाणा पराभव केला. याच पराभवाने यंदाच्या आयपीएलमधून मुंबईला गाशा गुंडाळावा लागला आहे. या पराभवामुळे मुंबईचा संघ गुणतक्त्यात तळाच्या स्थानावर घसरला आहे. संघाने या हंगामात १४पैकी १० सामने गमावले असून चार जिंकले आहेत. मुंबईच्या खात्यात आठ गुण असून हा संघ तळाला, १०व्या स्थानी आहे. याआधी सन २०२२मध्ये मुंबईवर अशी वेळ आली होती.

अशा प्रकारे दोनवेळा गुणतक्त्यात तळाला राहणाऱ्या बेंगळुरू संघाशी मुंबईने बरोबरी केली आहे. दोन्ही संघ आतापर्यंत गुणतक्त्यात तळाला राहिले आहेत. मुंबई सन २०२२ आणि २०२४मध्ये तळाला होती. तर, बेंगळुरूचा संघ सन २०१७ आणि २०१९मध्ये तळाला होता.

हे ही वाचा:

केजरीवाल यांनी न्यायालयात आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध करावे

कन्हैया कुमार यांना हार घालण्याच्या बहाण्याने मारहाण

मुंबईकरांनो रेकॉर्डब्रेक मतदान करा…देशात सगळे जुने विक्रम तुटणार आहेत

“तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलंय”

तर, पंजाबचा संघ आतापर्यंत तीनेवळा गुणतक्त्यात तळाला राहिला आहे. पंजाबचा संघ याआधी सन २०१०, २०१५ आणि २०१६मध्ये तळाला होता. तर, सध्या सुरू असलेल्या हंगामात पंजाबचा संघ नवव्या स्थानी आहे.
तर, दिल्लीचा संघ आतापर्यंत चारवेळा गुणतक्त्यात तळाला राहिला आहे. त्यांनी ही कामगिरी सन २०११, २०१३, २०१४ आणि २०१८मध्ये केली होती.

Exit mobile version