पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सुट्टी!

राज्य सरकारने जाहीर केली अधिसूचना

पश्चिम बंगालमध्ये यंदा पहिल्यांदाच रामनवमीला म्हणजे १७ एप्रिलला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बंगाल सरकारने शनिवारी या संदर्भातील अधिसूचना जाहीर केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय मानला जात आहे. बंगालमध्ये नेहमीच दुर्गापूजा, काली पूजा आणि सरस्वती पूजन हे दिवस मोठ्या सणासारखे धूमधडाक्यात साजरे केले जातात. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथे रामनवमी आणि हनुमान जयंतीचे दिवसही मोठ्या उत्साहाने साजरे केले जात आहेत.

हे ही वाचा:

‘सन २०१८मध्ये एनडीएशी फारकतीचे कारण केवळ राजकीय’

निवडणूक आयुक्त अरुण गोएल यांचा तडकाफडकी राजीनामा!

पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने मित्राची हत्या

रिकाम्या खुर्च्यांमुळे बिथरले ठाकरे-पवार

गेल्या वर्षी रामनवमीच्या दिवशी बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. भाजपने या मुद्द्यावरून पश्चिम बंगाल सरकारला लक्ष्य केले होते. राज्य सरकार रामनवमीच्या दिवशी लोकांच्या एकत्रित येण्यावर आणि धार्मिक यात्रा काढण्याच्या लोकांच्या अधिकारांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न करते आहे, असा आरोप भाजपतर्फे सातत्याने बंगाल सरकारवर केला जातो.

यंदा मात्र पश्चिम बंगाल सरकारने रामनवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाच्या बाबत मवाळ भूमिका घेण्याचा तृणमूल काँग्रेस पक्षाचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version