मानवी कश्यप बनली पहिली ट्रान्सजेंडर महिला पोलीस निरीक्षक !

ट्रान्सजेंडरची निवड करणारे बिहार पहिले राज्य

मानवी कश्यप बनली पहिली ट्रान्सजेंडर महिला पोलीस निरीक्षक !

बिहारच्या भागलपूरमधील एका छोट्या गावात राहणारी मानवी मधु कश्यप ही देशातील पहिली ट्रान्सजेंडर महिला पोलीस निरीक्षक बनली आहे. बिहार पोलीस सेवा आयोगाने निरीक्षक पदाच्या १२७५ रिक्त जागांचा नुकताच निकाल जाहीर केला होता. या निकालात तीन ट्रान्सजेंडर यशस्वी झाले. या तीन ट्रान्सजेंडरमध्ये दोन ट्रान्स पुरुष आणि एक ट्रान्सवुमन आहे. तीन ट्रान्सजेंडरची पोलीस निरीक्षक पदी निवड करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य बनले आहे.

पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्यानंतर मानवी मधु कश्यप यांनी सांगितले की, समाजाच्या भीतीने आपली ओळख लपवण्यासाठी पूर्वी घातलेला स्कार्फ आता काढून टाकणार आहे. पूर्वी तिची आई तिला भेटायला गुपचूप पाटण्याला यायची, पण आता ती तिच्या गणवेशात तिच्या गावी जाईल आणि सर्वांना सांगेल की तिला ट्रान्सजेंडर असण्याची लाज वाटत नाही.

हे ही वाचा:

केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर पण मुक्काम तुरुंगातच!

राहुल गांधी यांचे अग्निवीरबाबतचे आरोप बिनबुडाचे असल्याचे माजी अधिकाऱ्याने केले स्पष्ट

विधान परिषदेचे मतदान सुरू; कोण मारणार बाजी?

नेपाळमध्ये भूस्खलन होऊन प्रवाशांनी भरलेल्या दोन बस गेल्या नदीत वाहून

त्यांनी सांगितले की, ९ वी च्या वर्गात असतानाच मला समजले की मी एक सामान्य मुलगी नाहीये. त्यानंतर समाजापासून हळूहळू दूर झाली. आई, दोन बहिणी, एक भाऊ असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ९ महिन्यांपासून त्या त्यांच्या घरी गेल्या नसल्याचे सांगितले.आता पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गणवेशात गावात प्रवेश करून प्रथम आईला सॅल्यूट मारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version