पहिल्यांदाचं एनडीएच्या दीक्षांत संचलनात महिलांच्या बटालियनचे संचलन

पहिल्यांदाचं एनडीएच्या दीक्षांत संचलनात महिलांच्या बटालियनचे संचलन

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या म्हणजेच एनडीएच्या दीक्षांत संचलनात (मार्चिंग) नवा इतिहास घडला आहे. ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच दीक्षांत संचलनात महिलांच्या बटालियनने संचलन केले आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले आहे.

एनडीएचे १४५ वे दीक्षांत संचलन गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी पहाटे दिमाखात पार पडले. यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल रमेश बैस, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, एनडीएचे कमांडर व्हाइस ॲडमिरल अजय कोचर आदी मान्यवर उपस्थित होते.

संचलनाला संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, “आजच्या काळातही महिलांना आवडीचे करिअर निवडण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशातच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमध्ये दीक्षांत संचलनात महिलांचा सहभाग असणे हे निश्चितच कौतुकास पात्र आहे.”

एनडीए मधून एकूण ३५३ विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. संचलनानंतर ‘अंतिम पग’ पादाक्रांत केला गेला. संचलनात १२ विद्यार्थी हे मित्र देशांमधील होते.

हे ही वाचा:

‘अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रतिस्पर्धी असणे हे भारताचे दुर्भाग्य’

‘द रेल्वे मेन’चा जगभरात धुमाकूळ!

दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाचा भाऊ आणि वडील अटकेत

मुलुंडमध्ये प्रकाश गंगाधरेंच्या प्रयत्नाने नागरिकांना स्वस्तात कांदा

Exit mobile version