राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (१ जानेवारी) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही विकासकामांचे उद्घाटन झाले. यामध्ये अहेरी-गर्देवाडा बस मार्गाच्या उद्घाटनाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांत पहिल्यांदाच अहेरी-गर्देवाडा या मार्गावर बस धावली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह भागातील लोकांनी बसमधून प्रवास केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मला अतिशय आनंद होत आहे. नक्षलग्रस्त भाग असल्याने वर्षानुवर्षे याठिकाणी दळणवळणाची साधने नव्हती, तसरे नव्हते. पोलिसांनी चोख कामगिरी करत नक्षलवाद्यांचा भागातील संपूर्ण प्रभाव संपवून टाकला आहे. प्रशासनाच्या सर्व विभागाने कामे केल्यामुळे थेट छत्तीसगडशी जोडले गेलो आहोत.
७५ वर्षानंतर पहिल्यांदा बस सेवा या भागामध्ये सुरु होत आहे. लोकांना एक मोठी सुविधा मिळतेय. याठिकाणी नक्षलवाद्यांना नवी भरती मिळत नाही. नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत. त्यामुळे एकीकडे आपण नक्षलवाद्यांच्या समाप्तीकडे जात आहोत.
ते पुढे म्हणाले, पेनगोंड्याला एक नवीन आऊटपोस्ट तयार करून आता एकप्रकारे गडचिरोली जिल्ह्याला छत्तीसगडशी जोडण्यासजे काम आपण सुरू केले आहे. ज्या भागात माओवाद्यांचा मोठा प्रभाव होता तिथे आता आपला प्रभाव तयार झाला आहे.
हे ही वाचा :
मातोश्रीवर संजय राऊत यांना बुकलले? सोशल मीडियावर गरमागरम चर्चा
संरक्षण मंत्रालयाकडून २०२५ हे ‘सुधारणेचे वर्ष’ म्हणून घोषित
२६/११ चा आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा!
नव वर्षाच्या पहिल्या दिवशी लखनऊ हत्याकांडाने हादरलं; चार बहिणींसह आईची हत्या
सगळ्या प्रकारे लोकांनी माओवाद्यांना नाकारले आहे. १२ गावांनी ठराव करून माओवाद्यांना राशन-पाणी नाकारले आहे. त्यांनी जे आईडी लावले होते ते पोलिसांकडे जमा केले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात नवी पहाट तयार झालेली आहे. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नसून हा पहिला जिल्हा आहे, राज्याचे ते प्रवेशद्वार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, गेल्या ४ वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातला एकही तरुण किंवा तरुणी नक्षलवादी संघटनेत सहभागी झालेले नाही. नक्षलांचे वरिष्ठ नेते आत्मसमर्पण करत आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास भारताच्या संविधानावर आहे, नक्षलवादावर नाही, हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. नक्षलवाद्यांचे मोठे कंबरडे मोडले आहे, अजूनही मोडले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
Bridging Dreams, Connecting Lives!🛣️
Connecting over 20 remote villages, the 32.67 km Gatta-Gardewada-Todgatta-Vangeturi road and the Tadguda bridge mark a historic milestone in the region's development after 75 years of independence. CM Devendra Fadnavis is the first CM to visit… pic.twitter.com/nu1Oo7LFp0— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 1, 2025