जगभरातील क्रिकेटप्रेमींना लवकरच महिला टी- २० विश्वचषक सामान्यांचे थरार पाहायला मिळणार आहेत. ३ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होणार असून या दरम्यान आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे. या निर्णयानंतर पहिल्यांदाच संपूर्ण विश्वचषक स्पर्धेवर माहिला वर्गाची वर्णी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत सामनाधिकारी आणि पंच या सर्व भूमिका महिलाचं बजावणार आहेत. आयसीसीने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.
महिला टी- २० विश्वचषक या स्पर्धेसाठी आयसीसीने १० पंच, तीन सामनाधिकारी अशा एकूण १३ जणांची अधिकृत घोषणा केली आहे. अनुभवी पंचांना पॅनेलमध्ये स्थान मिळाले आहे. ज्यांना पूर्वीच टी- २० विश्वचषकातील पंच असण्याचा अनुभव असलेल्यांना संधी देण्यात आली आहे.
निवड झालेल्यांपैकी क्लेअर पोलोसाक पाचव्यांदा टी- २० विश्वचषकात पंच म्हणून काम पाहतील. तर किम कॉटन आणि जॅकलिन विल्यम्स या चौथ्यांदा पंचाची जबाबदारी सांभाळतील. मागील फायनलमध्ये स्यू रेडफर्न टीव्ही अंपायर होत्या. त्या चौथ्यांदा यात पंच होणार आहेत. जीएस लक्ष्मी, शांद्रे फ्रिट्झ आणि मिचेल परेरा यांच्याकडे सामनाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. जीएस लक्ष्मी यांना १२ वर्षांचा अनुभव आहे.
यंदाच्या महिला टी-२० विश्वचषकला ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. बांग्लादेश येथील सत्तापालट झाल्याने बीसीबीने यजमानपद गमावले. अशा परिस्थितीत आयसीसीने टी- २० विश्वचषक यूएईला हलवले.
हे ही वाचा :
तिरुपती लाडूत तंबाखू असल्याचा भक्ताचा दावा मंदिर समितीने फेटाळला!
दुकानं, हॉटेल्सवर मालकाचे नाव हवेचं; सीसीटीव्हीही बंधनकारक
कट्टरवादी संघटना ‘हिजबूत- तहरीर’संबंधी एनआयएकडून तामिळनाडूमध्ये छापेमारी
अमेरिकेतील भारतीय वंशांच्या ज्वेलर्सनी बनविली पंतप्रधानांची ‘हिऱ्यांची प्रतिमा’
सामनाधिकारी: जीएस लक्ष्मी, शांद्रे फ्रिट्झ आणि मिचेल परेरा
सामना पंच: लॉरेन एजेनबॅग, किम कॉटन, सारा दंबनेवाला, अन्ना हॅरिस, निमाली परेरा, क्लेयर पोलोसाक, वृंदा राठी, सू रेडफर्न, एलोइस शेरिडन आणि जॅकलीन विल्यम्स