देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते १५ एप्रिलला होणार उद्घाटन
वांद्रे पूर्वस्थितीत उत्तर भारतीय संघ भवनामध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आणि देवदर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या राहण्यासाठी बाबू आर. एन. सिंह अतिथीगृह निर्माणाचे कार्य पूर्ण झाले आहे. या अतिथीगृहांचे उद्घाटन शुक्रावार, १५ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.
उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर. एन. सिंह यांनी सांगितले की, “बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह हे ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालवण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातून विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात कर्करोगग्रस्त रुग्ण उपचारासाठी मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात येत असतात. अनेकदा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही रुग्णालयाबाहेर रस्त्यावर राहावे लागते. अशा रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अतिशय अल्प दरात बाबू आर. एन. सिंह अतिथीगृह उपलब्ध करून दिले जाईल. याशिवाय देवदर्शनाला येणाऱ्या नागरिकांना सुद्धा
अतिथीगृह उपलब्ध करून देण्यात येईल. या अतिथीगृहात परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाचे जेवणही मिळणार आहे.”
अशा असणार सुविधा-
वांद्रे पूर्व येथील टीचर्स कॉलनीच्या मागे असलेल्या उत्तर भारतीय संघ भवनात ६ हजार ८०० चौरस फुटांमध्ये ५० खाटांचे वसतिगृह आणि पाच एसी खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे महिलांसाठी वेगळे अतिथीगृह तयार करण्यात आले आहे. या अतिथीगृहामध्ये कॅन्टीनचीही सोय आहे. परवडणाऱ्या दरात अव्वल दर्जाचे जेवणही या कॅन्टीनमध्ये मिळणार आहे. सलग २६ वर्षे उत्तर भारतीय संघटनेचे अध्यक्ष राहिलेले आर. एन. सिंह यांचे अमूल्य योगदान लक्षात घेऊन संघाने त्यांच्या मृत्यूनंतर कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी आणि यात्रेकरूंसाठी नव्याने बांधलेल्या अतिथीगृहाचे नाव बाबू आर. एन. सिंह देण्याचे ठरवले आहे.
उत्तर भारतीयांचे स्वप्न साकार-
यावर्षी २ जानेवारीला आर. एन. सिंहचे निधन झाले होते. आर. एन. सिंह यांच्या नावाने अतिथी गृहाचे नामकरणासाठी त्यांचा मुलगा संतोष आर. एन. सिंह यांनी ५१ लाख रुपयांची देणगी दिली आहे. आर. एन. सिंह यांच्या नेतृत्वाखाली उत्तर भारतीय भवन बांधण्याचे उत्तर भारतीयांचे स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार झाले आहे.
हे ही वाचा:
एसटी कर्मचारी आत्महत्या प्रकरणी सुओ मोटो खटला भरा!
देशभरातील १० हजार मंदिरांना मोहित कंबोज देणार लाऊडस्पीकर
उत्तर भारतीय कुटुंबांसाठी मॅरेज हॉल-
संघाचे अध्यक्ष संतोष आर. एन. सिंह यांनी सांगितले की, संघाकडून नव्याने बांधण्यात आलेला विवाहगृह
एमएमआर प्रदेशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या उत्तर भारतीय कुटुंबांसाठी ३० हजार रुपये परवडणाऱ्या शुल्कात उपलब्ध करून दिला जाईल. यासोबतच संघाचे सामूहिक विवाह समारोह आयोजित करण्याची योजना आहे. यामध्ये आठ उत्तर भारतीय जोड्या असतील तर दोन मराठी जोड्या असतील.