ऋषभ पंतसाठी ड्रायव्हर-कंडक्टर ठरले देवदूत

ऋषभ पंतसाठी ड्रायव्हर-कंडक्टर ठरले देवदूत

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत एका अपघातात गंभीर जखमी झाला. पंतच्या कारला रुरकीजवळ अपघात झाला. त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर हरियाणा रोडवेजचा बस ड्रायव्हर सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत हे सर्वप्रथम पंतजवळ पोहोचले. त्यांनीच रुग्णवाहिका बोलावून पंतला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. कार डिव्हायड रवरून कोसळली तेव्हाचा क्षण एवढा भयानक होता की त्या बस ड्रायव्हरने आशाच सोडन दिली होती.

ऋषभ पंतला वाचवणारे बस कंडक्टर परमजीत म्हणाले की, ऋषभ पंतला मर्सिडीज बेंझमधून बाहेर काढताच कारला आग लागली. पाच ते सात सेकंदात कार जळून खाक झाली. त्याच्या पाठीवर खूप जखमा होत्या. आम्ही त्याच्याबद्दल विचारले आणि तेव्हाच तो म्हणाला की तो भारतीय संघाचा क्रिकेटर आहे.

ही कार बसच्या अगदी समोर आली. बसला आदळणार असे वाटत होते. आदळली तर आम्ही कोणाला वाचवू शकणार नाही, असा विचारही मनात आला. कारण कार आणि बसमध्ये ५० मीटरचे अंतर होते. तेवढ्याच अंतरात बस थांबवायची होती. तितक्यात मी सर्विस रोडवरून बस पहिल्या लेननमध्ये नेली अन् कार दुसऱ्या लेनमधून मागे गेली. अर्जंट ब्रेक मारला आणि गाडीमधून उडी टाकून कारकडे धाव घेतली, असे सुशील कुमारने सांगितले.

हेही वाचा :

भारताच्या एका इंच जमिनीवर कोणीही कब्जा करू शकत नाही

अपघातग्रस्त गाडीतून पडलेल्या ऋषभला त्या बसचालकाने वाचविले

 

पानिपतच्या दिशेने जाणारी बस हरिद्वारहून पहाटे ४.२५ वाजता निघाली आणि सुमारे तासाभरानंतर अपघातस्थळी पोहोचली. तर हरियाणाचे परिवहन मंत्री मूलचंद शर्मा म्हणाले की, कुमार आणि परमजीत या दोघांनी मानवतेचे दर्शन घडवले आहे. यामुळे पंत बचावला आहे.

 

 

Exit mobile version