पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याला ‘संकल्प पत्र’ असे नाव देण्यात आले असून अनेक मोठी आश्वासने जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.दरम्यान, भाजपच्या जाहीरनाम्यावर विरोधकांनी टीका केली होती.विरोधकांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले आहेत.काँग्रेससाठी जाहीरनामा कागद आहे.मात्र, आमच्यासाठी मोदींची गॅरंटी आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
नागरपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पुढील पाच वर्षे ८० कोटी नागरिकांना रेशन मोफत देण्याचा संकल्प आहे. तृतीयपंथींयाचाही आयुषमान भारतमध्ये समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, ७० वर्षावरील नागरीकांना युनिव्हर्सल मोफत उपचार देण्याचा निर्णय झाला आहे.प्रत्येक घरात पाईपलाईनने गॅस पोहोचविण्याचा संकल्प आहे.एक कोटी घरांना सोलरच्या उपक्रमाने त्यांचे वीज बिल मोफत करणार आहे.मुद्रा योजनेची मर्यादा २० लाख करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
ताब्यात घेतलेल्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी देणार
संयुक्त राष्ट्र प्रमुखांकडून इस्रायलवरील इराणच्या हल्ल्याचा निषेध!
‘मासे, डुक्कर किंवा हत्तीही खा, परंतु त्याचे प्रदर्शन का करता?’
इस्रायल-इराण संघर्षाबद्दल भारताने व्यक्त केली तीव्र चिंता!
काँग्रेसवर टीका करत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की.काँग्रेसचा जाहीरनामा हा अपयशी आहे. काँग्रेसने छत्तीसगड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये विजय मिळवला होता.मात्र, जाहीरनाम्यातून ज्या घोषणा करण्यात आल्या त्यातील एकही गोष्ट पूर्ण करण्यात आली नाही.आता कर्नाटकातूनही निवडून आले, पण जाहीरनाम्यातील एकही गोष्ट पूर्ण केली नाही.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेससाठी जाहीरनामा एक कागद आहे. मात्र, आमच्यासाठी मोदींची गॅरेंटी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच संविधान होतं, म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला. एनडीएचा प्रमुख म्हणून मोदींची निवड झाली, त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम संविधानाची पूजा केली. त्यानंतर पद स्वीकारले. कुठल्याही ग्रंथापेक्षा संविधान महत्त्वाच असल्याच पंतप्रधानांनी म्हटले. मागची दहावर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे स्पष्ट बहुमत आहे.पंतप्रधांनाही संविधानाच रक्षण केलं.त्यांनी संविधान बदलण्याचा विचार केला नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.