झाड कापण्यासाठी पालिकेचा सोसायटीच्या खिशावर दरोडा

झाड कापण्यासाठी पालिकेचा सोसायटीच्या खिशावर दरोडा

आपल्या इमारतीच्या आवारातील एखादे झाड कापण्यासाठी किती खर्च येईल, असा सवाल उपस्थित केला तर जे उत्तर मिळेल त्यापेक्षाही अनेक पटींनी शुल्क पालिकेने वसूल केले आहे.

बोरिवली पश्चिमेच्या एका सोसायटीच्या आवारात कोसळलेले झाड कापून वाहून नेण्यासाठी पालिकेने चक्क ८५ हजार रुपये शुल्क त्या सोसायटीवर आकारले आहे. ते भरण्यासाठी मग सोसायटीला बँकेतील मुदतठेवींवर कर्ज काढण्याची वेळ आली. यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून पालिकेच्या या अजब कारभारावर हल्लाबोल केला.

हे ही वाचा:

अरेरे! ७ वर्षांच्या मुलासह मातेने घेतली १२व्या मजल्यावरून उडी

तुंबलेल्या नदीतील कचरा काढण्याचा खर्च प्रवाही

ओबीसी आरक्षणाकडे ठाकरे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

मुख्यमंत्र्यांची आधी संमती, मग स्थगिती! आव्हाडांचा दावा

ते म्हणतात, सोसायटीच्या आवारात कोसळलेले वडाचे झाड कापून नेण्यासाठी महापालिकेने सोसायटीला ८५ हजार रुपये आकारले. महापालिकेच्या हव्यासापोटी या सोसायटीवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. मुंबईकरांना वादळात नुकसान भरपाई नाहीच वर खिशावर दरोडा टाकण्याचे काम मुंबई महानगरपालिका करते आहे.

तौक्ते चक्रीवादळात १७ मे रोजी बोरिवली पश्चिमेतील रिद्धी सोसायटीत एक वडाचे झाड कोसळले होते. सुमारे ५० फूट उंच असलेल्या या झाडाची कुजण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने दुर्गंधी पसरू लागली. त्यामुळे हे झाड कापून नेण्यासाठी सोसायटीने पालिकेकडे अर्ज केला होता.

चक्रीवादळ ही नैसर्गिक आपत्ती असून त्यात कोसळलेली झाडे ही पालिकेची जबाबदारी आहे. कोरोनाच्या काळात अनेक सोसायट्यांची आर्थिक स्थिती वाईट झाली आहे. त्यामुळे त्यांच्या या शुल्काचा भार टाकू नये, अशी विनंतीही सोसायट्यांच्या वतीने करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती असेल तर सोसायटीत पडलेली झाडे तोडण्यासाठी शुल्क आकारले जाऊ नये, असे सोसायट्यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version