27 C
Mumbai
Saturday, November 30, 2024
घरविशेषपाण्यात पडलेला फोन काढण्यासाठी २१ लाख लीटर पाणी काढून टाकले, अधिकारी निलंबित

पाण्यात पडलेला फोन काढण्यासाठी २१ लाख लीटर पाणी काढून टाकले, अधिकारी निलंबित

जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यावरही केली कारवाई

Google News Follow

Related

पाण्यात पडलेला आपला फोन काढण्यासाठी तब्बल २१ लाख लीटर पाणी शेततळ्यातून काढून टाकणाऱ्या छत्तीसगडमधील रेशन अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यासह आणखी एका अधिकाऱ्याच्या पगारातून झालेले नुकसान भरून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

राजेश विश्वास नावाच्या अधिकाऱ्याचा ९६ हजारांचा फोन साठवलेल्या पाण्यात पडला. १५ फूट पाण्यात हा फोन पडल्यानंतर ते साठवलेले तब्बल २१ लाख लीटर पाणी त्यांनी तब्बल ३ दिवसात काढून टाकले आणि फोन मिळविला. हेच पाणी १५०० एकर जमिनीसाठी उपयुक्त ठरू शकले असते. अधिकाऱ्याने आपला फोन मिळविला पण तो आता चालत नाही हे लक्षात आले आहे.

छत्तीसगडमधील ही खळबळजनक कहाणी घडली अशी

राजेश विश्वास हा अधिकारी कांकेर जिल्ह्यातील खेरकट्टा येथे सुट्टी घालविण्यासाठी आला होता. तेव्हा त्याच्या हातातील महागडा फोन तेथील साठवलेल्या पाण्यात पडला. सेल्फी घेत असताना फोन हातातून निसटला होता. काय करायचे हा विचार करून त्याने जलसंधारण खात्याशी संपर्क साधला. त्याला या खात्यातील अधिकाऱ्याने ३-४ फुटापर्यंत पाणी काढून टाकण्याची परवानगी दिल्याचे त्याचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांनी कबूल केले आम्ही थकलो!

पावसाची स्थिती यंदा सामान्य, ९६ टक्केचा अंदाज !

कुनो नॅशनल पार्कमध्ये जन्मलेल्या चित्त्याच्या चार बछड्यांपैकी आता एक जिवंत

माओवादी झालेली युवती १२वी उत्तीर्ण झाल्यावर होणार पोलिस

 

पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा प्रत्यक्षात १० फुटापर्यंत पाणी काढून टाकण्यात आले होते. राजेश विश्वासचे म्हणणे आहे की, डिझेल पंपाच्या मदतीने हे पाणी काढण्यासाठी ८ हजारांचा खर्च आला. या फोनमध्ये काही महत्त्वाचे नंबर असल्याचे त्याचे म्हणणे आहे पण आता तो फोन काम करत नाही.

आता जलसंधारण विभागातून त्याला परवानगी देणारा सबडिव्हिजनल अधिकारी व विश्वास यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ऐन उन्हाळ्याच पाण्याची अशी नासाडी या अधिकाऱ्यांनी मिळून केली. विश्वास याला निलंबित करण्यात आले आहे. तर जलसंधारण विभागातील अधिकारी धिवार याला त्याच्या पगारातून झालेले नुकसान भरून देण्यास सांगण्यात आले आहे. जर धिवार यांनी हे पैसे दिले नाहीत तर पुढील कारवाई केली जाईल.

विश्वासने मात्र या सगळ्या प्रकरणात स्वतःकडे अजिबात दोष घेतलेला नाही. उलट त्याने म्हटले आहे की, गावकऱ्यांनी पाण्यात फोनचा शोध घेतला आणि नंतर पाणी काढून टाकण्याचा सल्ला दिला त्यामुळे आपण हे पाऊल उचलले.शिवाय, विश्वासने जलसंधारण विभागावरही आरोप केले. त्यांनी हे पाणी कशासाठीही वापरले जात नसल्याचे सांगितल्यामुळे आपण ते काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
202,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा