23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषदिल्लीत धुक्यामुळे १० विमाने दुसरीकडे वळवली, २० उड्डाणे रद्द, ४०० विमानांना उशीर!

दिल्लीत धुक्यामुळे १० विमाने दुसरीकडे वळवली, २० उड्डाणे रद्द, ४०० विमानांना उशीर!

‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या प्रारंभासाठी इम्फाळला जाणाऱ्या राहुल गांधींचे विमानही धुक्यामुळे रखडले

Google News Follow

Related

रविवारी राजधानी दिल्ली शहरात सुमारे ११ तास पसरलेल्या दाट धुक्याच्या चादरीमुळे विमाने आणे रेल्वेसेवा पुरती कोलमडली होती. त्यामुळे हजारो प्रवासी विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर कित्येक तास ताटकळत होते, अशी माहिती विमानतळ आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

रविवारी दुपारी साडेबारा वाजता दृश्यमानता २०० मीटरपेक्षा कमी झाल्यामुळे पहाटे तीन ते साडेदहा वाजेपर्यंत म्हणजे जवळपास साडेसात तास ती शून्यावर आल्याने सुमारे ४०० विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला, १० विमाने दुसरीकडे वळवण्यात आली आणि किमान २० रद्द करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारी १२ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सूर्यप्रकाशामुळे दृश्यमानतेत थोडीशी सुधारणा झाली असली तरी या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा परिणाम संध्याकाळ उशिरापर्यंत जाणवत होता.

हे ही वाचा..

टिकली, लिपस्टिक अन् हातकड्या… परीक्षेत मुलगी असल्याचे भासवणाऱ्या पंजाबमधील मुलाला अटक!

शशी थरूर यांचे भाकीत… ‘भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येईल’

मुंबई- काळाचौकी परिसरातील पालिकेच्या शाळेत सिलेंडर्सचा स्फोट!

शरद मोहोळ हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी रामदास मारणेला अटक!

हा या वर्षीचा सर्वाधिक धुक्याचा कालावधी होता. कमी दृश्यमानतेमुळे १० विमाने जयपूरला वळवण्यात आली. एकूण किती उड्डाणांना उशीर झाला, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी दिल्ली विमानतळाच्या वेबसाइटनुसार, दिवसभरात सुमारे २०० विमाने उशिराने उड्डाण करणार होती. तर, १० विमाने रद्द करण्यात आल्याचे वेबसाइटवर दाखवण्यात येत होते. दृश्यमानता ८०० मीटरपेक्षा खाली उतरते तेव्हा विमान वाहतूक कंपन्यांना ही पावले उचलावी लागतात.

‘भारत जोडो न्याय यात्रे’ला प्रारंभ करण्यासाठी इम्फाळ येथे जाणाऱ्या राहुल गांधी यांचेही विमान या धुक्यामुळे रखडले. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत दृश्यमानता २०० मीटरच्या खाली घसरल्याने राहुल गांधी यांना विमानतळावरच प्रतीक्षा करत राहावे लागले. तर, राजधानी दिल्लीत जाणाऱ्या किंवा तिथून निघणाऱ्या २२ रेल्वेगाड्या किमान एक तास उशिराने धावत होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा