उड्डाणपूल की खड्डाणपूल?

उड्डाणपूल की खड्डाणपूल?

मुंबईतील खड्ड्यांमुळे लोकांमध्ये सध्या प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. गेल्या २१ वर्षांत मुंबईतील खड्ड्यांसाठी २१ हजार कोटी रुपये खर्च केल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र असे असले तरी खड्ड्यांची समस्या सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

आता मुंबईतील गोरेगाव बोरिवली भागातील दोन उड्डाणपुलांवर असलेल्या खड्ड्यांमुळे लोक प्रचंड त्रासले आहेत. गोरेगाव ते बोरिवली या भागातील उड्डाणपुलांवर तर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे रहदारीला प्रचंड अडथळा होत आहे. या उड्डाणपुलांवर सकाळ असो वा संध्याकाळ गाड्य़ांचा वेग रोज मंदावतो. त्यामुळे पुलांवर रहदारीची प्रचंड कोंडी होते. दुचाकी वाहनांना तर या खड्ड्यांनी त्रस्त केले आहे. पाठीच्या दुखण्यांनी दुचाकीस्वार ग्रासले आहेत. एकीकडे मुंबईत केवळ १९ खड्डे किंवा ११ खड्डे राहिल्याच्या बातम्या येत असताना या दोन पुलांवर असलेले खड्डे यात मोजले गेले नाहीत का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबईत गेल्या काही आठवड्यांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक अपघातांना या खड्ड्यांमुळे निमंत्रण मिळत आहे.

हे ही वाचा:

‘ही’ अट मान्य केली, तर टेस्लाच्या गाड्या स्वस्त होणार

आता शिल्पा शेट्टीच्या आईने केली तक्रार! काय आहे प्रकरण?

पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा

वाघाला दत्तक घ्या ३ लाखात!

गेली २४ वर्षे म्हणजे १९९७ पासून महापालिकेने नवे आंतररस्ते, खड्डे आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी २१ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. या २४ वर्षात सर्वात जास्त खर्च २०१४- १५ मध्ये झाला. या वर्षी ३२०१ कोटी रुपये रस्ते कामांवर खर्च करण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे २०१५ मध्ये ३४ रस्ते दुरुस्तींतील घोटाळाही चांगलाच चर्चेत राहीला होता. त्यामुळे पालिका प्रशासन आणि शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली होती. २००२- ०३ मध्ये सर्वात कमी ८०.५ कोटींचा खर्च झाला.

Exit mobile version