सोनचाफ्याला आला सोन्याचा भाव! एक चाफा मिळतोय या किमतीला…

सोनचाफ्याला आला सोन्याचा भाव! एक चाफा मिळतोय या किमतीला…

सणासुदीच्या दिवसांत एरवीही मार्केटमध्ये फुले विकत घेणे खिशाला कात्री लावणारे असते. मार्गशीर्ष महिन्यातही फुलांच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्यातच शनिवारी दत्तजयंती असल्यामुळे फुलांना सोन्याचा भाव आला आहे.

दादरच्या फूल मार्केटमध्ये चाफ्याची फुले मिळणेही मुश्कील झाले होते. मिळालाच तर त्याचा दर अव्वाच्या सव्वा होता. ४० फुलांचे पाकीट ४०० रुपयांना मिळत होते. म्हणजेच एक चाफ्याचे फूल १० रुपयाला असा भाव सुरू होता. अवघी पाच चाफ्याची फुले घेतली तर ५० रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे चाफ्यासाठी मार्केटमध्ये आलेल्या ग्राहकांना हिरमुसले होऊन परतावे लागत होते.

मार्गशीर्ष महिन्यात घराघरात होणारी पूजाअर्चा लक्षात घेता फुलांचे भाव गगनाला भिडले आहेत. विशेषतः गुरुवारच्या दिवशी फुलांचा महागाईचा उच्चांक होतो. नारंगी व पिवळी गोंड्याची फुले ४० किंवा ५० रुपये पाव किलो भावाने मिळत आहेत. सर्वसाधारणपणे इतरवेळेला २० ते ४० रुपये किलो अशा भावाने मिळणारी गोंड्याची फुले आता या दिवसांत १२० किंवा १४० रुपये किलोने मिळत आहेत.

मोगऱ्याच्या गजऱ्यांना या दिवसांत अधिक मागणी असते. मात्र मोगरा उपलब्ध होणेही कठीण झाले आहे. विक्रेत्यांनाच मोगरा विकत घेणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे गजरे तयार केले असतीलच तर ते ५० रुपयांना ३ अशा भावाने मिळतात. मध्यम आकाराचे हारही ५० रुपयांना दोन म्हणजे २५ रुपयाला एक अशा भावाने मिळतात. एरवी ३० रुपयांना दोन हार मिळतात. तुळसही महाग झाली आहे. तुळशीची एक जुडी ५० रुपयांना मिळते आहे.

हे ही वाचा:

अनिल परब, हा तुझ्या बापाचा पैसा आहे का?

मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात फेरी मारताना सीसीटीव्ही का बंद होते?

राष्ट्रवादी काँग्रेसने शासकीय निधी देऊन फोडली शिवसेना

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे की अनिल परब?

 

काही फुलांची तर आवकच कमी असल्यामुळे सकाळी लवकरच ती संपतात आणि ग्राहकांना हात हलवत परतावे लागते. गणेशोत्सव, दिवाळीतील लक्ष्मीपूजन, पाडवा, नवरात्री अशा प्रत्येक सणाला फूल मार्केटमध्ये फुलांचे दर गगनाला भिडतात.  कोरोनामुळे मंदिरे बराच काळ बंद होती, त्यावेळी फुलांचे भाव उतरले होते, पण आता मंदिरे पुन्हा खुली झालेली असल्यामुळे फुलांना सोन्याचीच किंमत आल्यासारखी स्थिती बनली आहे.

 

Exit mobile version