23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषफ्लॉवर नही फायर है नितीश रेड्डी!

फ्लॉवर नही फायर है नितीश रेड्डी!

संघ अडचणीत असताना नितीश रेड्डीचे दमदार शतक

Google News Follow

Related

भारताने बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील चौथ्या सामन्यात नितीश रेड्डी याचे झुंजार शतक आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय संघाच्या डोक्यावर फॉलोऑनची टांगती तलवार होती. संघ अडचणीत असताना नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या दमदार खेळी करत फॉलोऑनची नामुष्की टाळली. भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात ९ बाद ३५८  धावा केल्या आहत. नितीश रेड्डी नाबाद १०५ तर सिराज २ धावांवर नाबाद तंबूत परतले आहेत. अजूनही भारतीय संघ ११६ धावांच्या पिछीडीवर आहे.

पहिल्या सत्रात ऋषभ पंत २८ धावा करून तंबूत परतला. तर रवींद्र जडेजा १७ धावा करून बाद झाला. टीम इंडियाच्या फलकावर धावा होत्या सात बाद २२१. त्यानंतर नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी आठव्या विकेटसाठी २८५ चेंडूत १२७ धावांची भागीदारी करून फॉलोऑन टाळला. वॉशिंग्टन सुंदर १६२ चेंडूत अर्धशतक करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँडने ३-३ बळी घेतले. नॅथन लायनने २ बळी घेतले.

हेही वाचा:

महाराष्ट्रात अवैध घुसखोरीविरोधात कारवाई सुरू, १६ बांगलादेशींना अटक!

पोलीस अधिकारी मोहम्मद मोहसीन खानचा पीएचडी कार्यक्रम रद्द

अण्णा विद्यापीठ लैंगिक अत्याचार प्रकरण : मद्रास उच्च न्यायालयाने स्वतःहून केली कारवाई

महाराष्ट्रात अवैध घुसखोरीविरोधात कारवाई सुरू, १६ बांगलादेशींना अटक!

नितिश रेड्डीची कारकीर्द
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे नितीश रेड्डी यांचा जन्म झाला.आयपीएलमध्ये नितीश रेड्डीला २० लाखांच्या बेस प्राइसमध्ये खरेदी केले होते. आयपीएलमध्ये नितीश हैदराबादकडून क्रिकेट खेळतो. नितीश रेड्डी अष्टपैलू खेळाडू आहे. तळाच्या क्रमवारीत फलंदाजी करण्याबरोबरच तो वेगवान गोलंदाजीतही पारंगत आहे. नितीश रेड्डी आंध्र प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. नितीश रेड्डीने २६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ९५८ धावा केलेल्या आहेत आणि ५९ विकेट्सही घेतल्या आहेत.

शतक झळकावताच नितीशच्या वडीलांचे अश्रू अनावर


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी नितीश रेड्डीने शतक झळकावल्यानंतर त्याचे वडील मुत्याला रेड्डी यांना अश्रू आवरले नाही. एमसीजी स्टँडच्या पहिल्या रांगेत उभे असलेले नितीश रेड्डी यांचे वडील सतत देवाला प्रार्थना करत होते. कारण त्यांच्या मुलाला पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड सारखे गोलंदाजांविरुद्ध मैदानावर काही कठीण क्षणांना सामोरे जावे लागले. नितीश रेड्डी याने शतक पूर्ण करताच त्याचे वडील मुत्याला रेड्डी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्यांनी हात जोडून देवाला प्रार्थना केली. यावेळेस भारतीय चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा