मागील काही दिवसांपासून भारताच्या दक्षिणेकडील राज्यांना पावसाने झोडपले असून पावसाचा सर्वात जास्त तडाखा हा आंध्रप्रदेश राज्याला बसला आहे. आंध्रप्रदेशमध्ये सर्वात जास्त वित्तहानी आणि जीवितहानी झाली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्रप्रदेशमधील अनेक किनारी भागात मुसळधार पाऊस पडला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. आंध्रप्रदेशमध्ये आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे १०० लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. धरण फुटल्यामुळे चेय्येरू नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे अनेक खेड्यांमध्ये पाणी शिरले आहे.
आंध्रप्रदेश राज्याला पावासाने अक्षरशः झोडपून काढले असून घरे कोसळली आहेत, रस्ते दुभंगले आहेत अनंतपूर जिल्ह्यातील चित्रावती नदीची पाणी पातळी वाढून दहा लोक अडकल्याची घटना काल घडली होती. भारतीय वायुसेनेच्या एमआय १७ या हेलीकॉप्टरच्या मदतीने लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. याचा व्हिडीओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता.
#WATCH | Today, Indian Air Force's Mi-17 helicopter evacuated ten people stuck in the rising waters of Chitravati river in Ananthapur district, Andhra Pradesh, in difficult weather conditions.
(Video: IAF) pic.twitter.com/jT4qMBgxFl
— ANI (@ANI) November 19, 2021
प्रसिद्ध तिरुपती मंदिरात आणि परिसरात पाणी साचल्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये रस्ते बंद करण्यात आले आहेत. कडप्पा जिल्ह्याला या पुराचा प्रचंड फटका बसला असून या जिल्ह्यात एक बस पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे.
हे ही वाचा:
ब्लॅक कॅप्सना भारत व्हाईट वॉश देणार?
हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाणीवपूर्वक टार्गेट
देवेंद्र फडणवीस दंगलग्रस्त अमरावतीच्या दौऱ्यावर
अमेरिकेत राष्ट्रपती पदाची सूत्रे उपराष्ट्रपतींकडे सोपवू शकतात मग महाराष्ट्रात का नाही?
तामिळनाडूमध्येही पावसाने हाहाकार माजवला असून तिथलेही जनजीवन विस्कळीत झाले आहे. तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात घर कोसळून चार मुले, चार महिलांसह नऊ जण ठार झाले असून ९ जण जखमी झाले आहेत. इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.