24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषपुरात सर्वस्व वाहून गेले आता कागदपत्रं आणायची तरी कुठून?

पुरात सर्वस्व वाहून गेले आता कागदपत्रं आणायची तरी कुठून?

Google News Follow

Related

महाडमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना अजूनही विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही त्यामुळे व्यापारीवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाडमधील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाने विशेष बाब म्हणून संबंधित विमा कंपन्यांना तातडीने विमा रक्कम देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी महाडमधील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय मेहता व ज्येष्ठ व्यावसायिक पप्पूशेठ मुंदडा यांनी केली आहे.

जुलैमध्ये आलेल्या महापुरामध्ये सुमारे तीन हजार व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. न्यु इंडिया इन्शुरन्स आणि ओरिएन्टल इन्शुरन्स या दोन प्रमुख कंपन्यांकडून व्यापाऱ्यांनी विमा घेतलेला आहे. मात्र आपत्तीस आता दोन महिने उलटून गेले तरी विमा कंपन्यांनी विम्यातून मिळणारी रक्कम अद्यापही दिलेली नाही.

हे ही वाचा:

मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात

महाराष्ट्रातील जंगल सफारी पुन्हा सुरु होणार

भायखळा तुरुंगात तब्बल ३९ कैद्यांना झाला कोरोना

खासगी क्लासचे दरवाजे उघडू द्या!

इन्शुरन्स कंपन्यांकडून व्यापारी आणि व्यावसायिकांकडे १४ ते १५ विविध कागदपत्रांची मागणी केली आहे. मात्र, ही मागणी पूर्ण करणे अशक्य आहे, असे महाड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय मेहता यांनी सांगितले. महापुरात सर्वस्व वाहून गेलेल्या या व्यापाऱ्यांकडे मालाच्या खरेदीची कागदपत्रे, बिले मिळणे अशक्य असून ही बाब कंपन्यांनी लक्षात घेणे गरजेची आहे. कंपन्यांची ही कागदपात्रांची मागणी अवाजवी आणि व्यापाऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहणारी आहे, असेही मेहता यांनी सांगितेल. विमा कंपन्यांनी नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन त्यांच्या अटी आणि शर्तींमध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी ज्येष्ठ व्यावसायिक पप्पूशेठ यांनी केली आहे.

गुरुवारी झालेल्या महाडमधील पूर निवारण समितीच्या बैठकीत विमा कंपनी अधिकारी गैरहजर राहिल्याने खासदार सुनील तटकरे २७ सप्टेंबर रोजी विमा अधिकाऱ्यांची जिल्हा स्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आता पूरग्रस्तांचे या बैठकीकडे लक्ष असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा