देशातील अनेक राज्यांना जुलैच्या मध्यापासून पावसाने झोडपले. काही राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. काउन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट आणि वॉटरच्या विश्लेषणानुसार गेल्या ५० वर्षात महाराष्ट्रात आलेल्या पुरांच्या वारंवार येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आजही राज्यातील १०.२३ दशलक्षांहून अधिक लोक या आपत्तीचा सामना करत आहेत.
काउन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट आणि वॉटरच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी हे तीन जिल्हे पुरासाठी हॉट स्पॉट ठरत आहेत. महाराष्ट्रातील पुरांच्या घटनांमध्ये सहा पटींनी वाढ झाली आहे. एकट्या मुंबईतील पूर येण्याच्या घटनेत तीन पटींनी वाढ झालेली आहे. गेल्या दहा वर्षात सोलापूर, सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वादळ आणि चक्रीवादळ वारंवार येण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.
महाराष्ट्रासारख्या राज्यात हवामानातील बदलामुळे घडणाऱ्या घटनांना तोंड देण्यासाठी सक्षम पायाभूत सुविधा, उद्योग आणि समुदाय यांना चालना देण्याची आवश्यकता आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. सततच्या वातावरणातील वाईट बदलांमुळे किनाऱ्यावरील जैव विविधतेला धोका निर्माण होत आहे, असे हवामान तज्ज्ञ अबिनाश मोहंती यांनी सांगितले. खारफुटी आणि जंगले यांसारख्या नैसर्गिक घटकांना पुनर्संचयित केल्यास हवामानातील सूक्ष्म बदल जे जमिनीची सुपीकता कमी करण्यास कारणीभूत ठरतात, त्यांना रोखतात. पूर आणि चक्रीवादळासारख्या संकटांची तीव्रता कमी करण्यासही मदत करतात, असेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
…म्हणून मिराबाईने केला १५० ट्रक चालकांचा सत्कार
आदर पुनावाला म्हणून भेटले आरोग्यमंत्र्यांना…
आपात्कालिन वापरासाठी जॉन्सन अँड जॉन्सनकडून देखील अर्ज
या राज्यालाही द्या, भारतीय हॉकीच्या यशाचे श्रेय!
गेल्या पन्नास वर्षांत गोवा राज्यातही पुरांच्या घटनांमध्ये चार पटींनी वाढ झाली आहे. गोव्यातील उत्तरेकडील भागाला वादळाचा जास्त फटका बसत असून दक्षिणेकडील भागाला कमी फटका बसल्याचे दिसून आले आहे.