जुलैच्या मध्यात आलेल्या मुसळधार पावसाने कोकणाला चांगलेच झोडपून काढले होते. महापुरादरम्यान कोकणात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली होती. महाड, चिपळूण भागातील औद्योगिक वसाहतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे होते. महापूर ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही काळजी करू नका, चिपळूण पुन्हा नव्याने उभे करू,’ असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला होता. मात्र, महापुराला दीड महिना लोटला तरी पूरग्रस्त अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे की, कृती शून्य वाफा… “तुम्ही काळजी करू नका, चिपळूण पुन्हा नव्याने उभे करू” म्हणून दीड महिन्यापूर्वी चिपळूणात दिलेले आश्वासन निव्वळ लोणकढी थाप ठरले. जाचक अटींमुळे आजतागायत मदतीचा छदामही तिथे पोचलेला नाही. बोलाचीच कढी बोलाचाच भात.
महापुरामध्ये चिपळूण शहरासह खेर्डी कळंबस्ते परिसरात सुमारे १० ते १२ फूट पाणी शिरल्याने अनेक घरांमध्ये, दुकानांत पाणी शिरून नुकसान झाले. तसेच पुराचे पाणी औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्येही शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले. दुकानांमधील साहित्य, कच्चा माल आणि कारखान्यातील उत्पादनांचेही मोठे नुकसान झाले होते.
हे ही वाचा:
पेंग्विनमुळे नाही; तर शुल्कवाढीमुळे वाढले उत्पन्न
अश्लील संभाषण करणाऱ्याला महिलांनी चोप चोप चोपले
पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणारा ख्रिस्ती भोंदू अटकेत
भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री! मोदी-शहांचे धक्कातंत्र कायम
दोन दिवसांपूर्वी चिपळूण व्यापारी महासंघटनेने तहसीलदारांना शासकीय मदतीसंदार्भात निवेदन दिले असून मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या इशाऱ्याचा परिणाम काय होतो ते दिसून येईल, पण तोपर्यंत काय करायचे असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. काही व्यापाऱ्यांनी आपल्या हिमतीवर पुन्हा व्यापार सुरू केला आहे. मात्र, अजूनही अनेक व्यापारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाचे दुर्लक्ष, इन्शुरन्स कंपन्यांच्या जाचक अटी यामुळे आर्थिक संकटात आहोत. शासनाकडे आमच्या समस्यांकडे लक्ष न दिल्यास उपोषण छेडू, असे नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन कदम यांनी सांगितले.
कृती शून्य वाफा…
"तुम्ही काळजी करू नका, चिपळूण पुन्हा नव्याने उभे करू" म्हणून दीड महिन्यापूर्वी चिपळूणात दिलेले आश्वासन निव्वळ लोणकढी थाप ठरले. जाचक अटींमुळे आजतागायत मदतीचा छदामही तिथे पोचलेला नाही. बोलाचीच कढी बोलाचाच भात. pic.twitter.com/HYHi2EGSew— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 13, 2021