ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगला असून काल मेलबर्नमध्ये कट्टर प्रतिस्पर्धक भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडले. मेलबर्नमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या आपल्या सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर चार विकेट्सनी रोमहर्षक विजय मिळविला. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणारा ठरला. त्यानंतर जिथे तिथे या सामन्याची चर्चा सुरू आहे. अशातच चक्क या सामन्यातील शेवटची दोन निर्णायक षटकं पाहण्यासाठी एका विमानाचं उड्डाण पाच मिनिटं उशिराने केल्याची शक्यता समोर आली आहे. मुंबई विमानतळावर हा प्रसंग घडल्याचे एका अभिनेत्याने सांगितले.
भारताच्या विजयानंतर अभिनेता अयुषमान खुरानाने ट्वीटरवर तीन ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्याने सामन्यातील शेवटच्या दोन षटकं पाहता यावी म्हणून विमानचं उड्डाण पाच मिनिटं उशीराने झाल्याचं म्हटलं आहे. “ही गोष्ट माझ्या पुढल्या पिढ्यांना सांगता येईल. मी भारत- पाकिस्तान सामन्यातील शेवटची दोन षटकं मुंबई- चंदीगढ विमानामध्ये पाहिली. विमानाचे उड्डाण होण्याच्या काही मिनिटं आधी इतर प्रवाशीही त्यांचे मोबाईल घेऊन बसले असताना मी ही अशाच पद्धतीने शेवटची दोन षटकं पाहिली. मला विश्वास आहे की क्रिकेटचा चाहता असलेल्या वैमानिकाने मुद्दाम पाच मिनिटं उशीर केला आणि विशेष म्हणजे याबद्दल कोणीही तक्रार केली नाही,” असं आयुषमानने म्हटलं आहे.
This story is for my future generations. I watched the final two overs inside the Mumbai-Chandigarh flight just before taking off with the passengers glued to their cell phones. I’m sure the cricket fanatic pilot delayed it deliberately by 5 mins, and nobody was complaining. 1/2
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) October 23, 2022
“पंड्या आणि दिनेश कार्तिक बाद झाले. त्यानंतर अश्विन फलंदाजीसाठी आला. त्याने आरामात वाईड बॉल सोडून दिला. अंतिम धाव त्यानेच घेतली. मी यापूर्वी कधीच विमानामध्ये अशाप्रकारचा एकाच वेळी केलेला जल्लोष पाहिला नाही. आमचं विमान रनवेवर धावण्यासाठी तयार असतानाच हे सारं घडलं. वैमानिकानेही अचूक टायमिंग साधलं,” असंही ट्विट आयुषमान याने केले आहे.
Pandya and DK got out. Then came in Ashwin. Coolly gauged the wide ball. Well left. Scored the final runs. I’ve never witnessed a collective uproar of applause inside an aircraft. All this was happening while we were full throttle on the runway. Great timing by the flight captain
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) October 23, 2022
हे ही वाचा:
राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल ही माहिती आली समोर
गांधी कुटुंबाला दणका, राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द
उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान इस्रोबद्दल काय म्हणाले?
“मी हे रेकॉर्ड करु शकलो असतो तर किती बरं झालं असतं. मात्र, मला एक मान्य करावं लागेल की अशा गोष्टी सार्वजनिक आयुष्यात करायला मला अवघडल्यासारखं होतं. मला तो क्षण जगायचा होता. विराट कोहली आणि भारतीय संघाचे मी आभार मानतो त्यांनी एक दिवस आधीच देशाला दिवाळी साजरी करण्याची संधी दिली,” असंही ट्विट आयुषमान खुरानाने म्हटलं आहे.
Wish I could record it on my phone. But let me confess, I’m socially awkward doing these things. Also I wanted to live this experience. Thank you team india and Virat for bringing in Diwali a day early. #INDvsPAK 🇮🇳
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) October 23, 2022