“घरातून काम करणे ही भविष्यातील गरज”

“घरातून काम करणे ही भविष्यातील गरज”

लवचिक कामाचे तास, विशेषतः महिलांसाठी लवचिक कामाची ठिकाणे आणि घरातून काम करणे ही भविष्यातील गरज असेल असं पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी म्हटलं आहे. कामगार मंत्री, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या व्हिडिओ लिंकद्वारे त्यांचे उद्घाटन भाषण देताना पंतप्रधानांनी नमूद केले की लवचिक कामाच्या तासांचा अवलंब करून महिला शक्तीचा चांगला उपयोग केला जाऊ शकतो.

महिला शक्तीचा वापर करून भारत लक्ष्यित उद्दिष्टे जलदगतीने साध्य करू शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच व्हिजन २०४७ च्या अनुषंगाने महिला कर्मचार्‍यांसाठी, विशेषतः उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये आणखी काय करता येईल यावर केंद्रीय कामगार मंत्रालय व्हिजन तयार करत आहे.

“लवचिक कामाची ठिकाणे, घरातून काम करणारी इकोसिस्टम आणि लवचिक कामाचे तास ही भविष्यातील गरज आहे. महिला कर्मचार्‍यांसाठी संधी निर्माण करण्यासाठी आम्ही लवचिक कार्यस्थळांसारख्या प्रणालींचा वापर करणे आवश्यक आहे,” असं पंतप्रधान माेदी म्हणाले. त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केलेल्या मुद्द्यांची आठवण करून दिली. “पहिल्या तीन औद्योगिक क्रांतींचे फायदे मिळवण्यात भारत मागे राहिला परंतु, नोकऱ्यांच्या स्वरूपातील बदलांच्या अनुषंगाने आपल्याला बदलण्याची गरज आहे,” असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवलं.

हे ही वाचा:

‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

गुलामगिरीचे कायदे रद्द करण्यास पुढाकार

गेल्या आठ वर्षांत देशातील गुलामगिरीचे कायदे आणि गुलामगिरीची मानसिकता रद्द करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. कामगार कायदे सोपे करत आहे. हे लक्षात घेऊन २९ कामगार कायदे चार सोप्या कामगार संहितांमध्ये रूपांतरित केले आहेत. विकसित भारत घडवण्याचे स्वप्न साकार करण्यात भारताच्या श्रमशक्तीचा मोठा वाटा आहे. संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी कामगारांसाठी देश अखंड कार्यरत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं

Exit mobile version