23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

१७ सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन’ म्हणून साजरा केला जातो.

Google News Follow

Related

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १३ महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला होता. दरम्यान, १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जात असून त्यानिमित्ताने औरंगाबादमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन आपले सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा देखील केल्या.

औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी १३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पैठणमध्ये पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, संत उद्यान, क्रीडा संकुल बनवणार, अशा घोषणा त्यांनी केल्या आहेत. तसेच जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार. मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प हाती घेणार. घृणेश्वर मंदिराच्या विकासासाठी १५७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

‘जन धन’ नावाचा चमत्कार!

‘जॉन्सन बेबी पावडर’चा उत्पादन परवाना कायमचा रद्द

आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना एसीबीकडून अटक

चीनमधली ६५६ फूट उंचीची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी

या दिनानिमित्त पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमनेसामने आले आहेत. ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री तात्काळ हैदराबादकडे रवाना झाले आहेत. हैदराबादमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांनी केवळ १५ मिनिटेच उपस्थिती दर्शवल्यामुळे या दौऱ्यावर शिवसेनेने आक्षेप घेत टीका केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा