नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म झाला. भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वडिलोपार्जित घर आहे. सावरकर वाडा म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक’ म्हणून जतन करण्यात आले आहे.७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिकमधील भगूर येथील सावरकर वाडा येथे ध्वजारोहण सोहळा पार पडला.
या सोहळ्यात भारतीय लष्कराचे जवान सहभागी झाले होते.याशिवाय भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.भगूरमध्ये ध्वजारोहण केल्यानंतर भारतीय सैन्यात वीर म्हणून देशसेवा करणारे महेश सोनावणे म्हणाले की, भगूर येथील रहिवासी असलेल्या सावरकर बंधूंनी स्वातंत्र्य चळवळ सुरु केली याचा आम्हाला अभिमान आहे. सावरकरांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, त्यांच्याकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले. तसेच सावरकर ही केवळ चळवळ नसून एक कल्पना असल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा:
सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे कार्य करू!
भारतीय वंशाच्या निशा अमेरिकी वित्तसंस्थेच्या महत्त्वाच्या पदावर
अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व बहाल !
मेरे प्यारे परिवारजन… म्हणत पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाचा लेखाजोगा मांडला
यावेळी नाशिक जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाचे शामकांत गोसावी यांची विशेष उपस्थिती होती.नायक महेश सोनावणे व शामकांत गोसावी यांनी वीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले.कार्यक्रमाचा शेवट योगेश बर्क यांनी केला.स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे मनोज कुवर, भूषण कापसे, आकाश चेहरे, खंडू रामगडे , ओम देशमुख, शंकर मुंधरे, मंगेश मरकड, सुनील जोरे, आशिष वाघ, प्रवीण वाघ, विजय घोडेकर, आकाश कुवर, सार्थक मरकड, बंटी आंबेकर आदी या कार्यक्रमात उपस्थित होते.