पुण्यात पाण्याची टाकी कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. भोसरीमधील सदगुरू नगर येथे पाण्याची टाकी अचानक कोसळल्यामुळे पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे कामगार लेबर कॅम्पमध्ये राहत होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू आहे. प्रशासनाकडून या घटनेचा तपास केला जात आहे.
गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी पाण्याची टाकी कोसळल्यामुळे अपघात झाला. तात्पुरत्या स्वरूपाची सोय म्हणून बांधलेली पाण्याची टाकी अचानक कोसळली, या दुर्घटनेत पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे कामगार लेबर कॅम्पमध्ये वास्तव्याला होते. गुरूवारी सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचाव कार्य सुरू आहे. प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या इतर कामगारांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी ही घटना टाकी नुकतीच बांधली असून त्यात पाणी भरल्याने टाकी कोसळून दुर्घटना झाल्याचे सांगितले आहे.
हे ही वाचा :
सलमानसाठी धमकीचा संदेश पाठवणाऱ्या हुसैन शेखला ठोकल्या बेड्या
मविआचा ८५ चा फॉर्म्युला ठरला, उर्वरित जागांवर मित्र पक्षांसोबत चर्चा!
दहशतवाद-फंडिंगशी लढा देत, तरुणांना कट्टरतावादाकडे जाण्यापासून रोखायचय!
काँग्रेसने विधानसभेची जबाबदारी कर्नाटक-तेलंगणामधील लोकांवर दिली, बॉर्डर सील करा, कोटी रुपये येतील!
घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रशासनाकडून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. काही मजूर पाण्याच्या टाकीखाली आंघोळ करत असताना ही घटना घडली. पाण्याच्या टाकीच्या कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून संबंधित कंत्राटदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे.