इस्रायलने केला गेम! मशिदीत लपलेले पाच पॅलेस्टाइनी दहशदवादी ठार

इस्रायली सैन्याची कारवाई

इस्रायलने केला गेम! मशिदीत लपलेले पाच पॅलेस्टाइनी दहशदवादी ठार

इस्रायली सैन्याने तुलकरेम या वेस्ट बँक शहरातील मशिदीत लपून बसलेल्या पाच पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना ठार मारल्याची घटना घडली आहे. २९ ऑगस्टच्या मध्यरात्री हा प्रकार घडला. मृत दहशतवाद्यांमध्ये स्थानिक दहशतवादी नेत्याचा समावेश आहे.

इस्त्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) २८ ऑगस्ट रोजी तुलकरेम शहरात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली होती. त्यासोबतच या ऑपरेशनचा एक भाग म्हणून जेनिन शहर आणि तुबासजवळील फारा कॅम्पमध्येही सैन्य कार्यरत असल्याचे वृत्त आहे. एक दिवसापूर्वी, पॅलेस्टिनी मीडियाने वृत्त दिले होते की, चालू असलेल्या IDF ऑपरेशन दरम्यान ११ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.

हेही वाचा..

हिंदू धार्मिक चिन्हे असलेले विजेचे खांब हटवण्याचे आदेश

बांगलादेशात जमात-ए-इस्लामी, इस्लामी छात्र शिबीरवरील बंदी उठवली

आसामला धमकावण्याची हिंमत कशी केली ?

जम्मू काश्मीरमधील दोन चकमकींमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

तुलकरेमच्या वेस्ट बँक शहरात इस्रायल बॉर्डर पोलिसांच्या एलिट यमाम-दहशतवाद विरोधी युनिटच्या सैन्याने शिन बेटद्वारे प्रदान केलेल्या त्यांच्या ठावठिकाणाविषयी गुप्तचर माहितीच्या आधारे मशिदीमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांशी दोन हात केले.

अहवालानुसार, मृतांमध्ये मुहम्मद जाबेरचा समावेश आहे. हा अबू शुजा म्हणून ओळखला जातो. तो पूर्वी पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादच्या स्थानिक विंगचा कमांडर असल्याचे पॅलेस्टिनी मीडियाने सांगितले होते. शिन बेट म्हणतात की मोहम्मद जाबेर अनेक दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि निर्देशित करण्यात गुंतला होता. यात जूनमध्ये कलकिल्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अमनॉन मुख्तरच्या हत्येचा समावेश होता. या कारवाईत एका दहशतवाद्यालाही अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version