महाराष्ट्रात नगरच्या नेवासामध्ये एका मांजरीला वाचवण्याच्या नादात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी गावात ही दुर्देवी घटना घडली आहे. घराजवळच्या विहीरीत पडून पाच जणांचा मृत्यू झाला असून फक्त एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे.
नगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी गावामधील एक मांजर विहीरीत पडली होती. शेण टाकण्यासाठी या विहीरीचा वापर होत होता. वापरात नसलेली ही विहीर गाळाने भरलेली होती. मांजराला वाचाविण्यासाठी आधी एक जण विहिरीत उतरला होता, त्यावेळी तो व्यक्ती बुडाला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी चार जण विहिरीत उतरले होते. मात्र, त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. टाकाऊ पदार्थ टाकण्यासाठी या विहीरीचा वापर सुरु होता.
हे ही वाचा:
भारतात यंदा मान्सून राहणार सामान्य
१० वर्षांत सेन्सेक्स २५ हजारांवरून ७५ हजारांवर!
‘इस्रायलला शस्त्रे पाठवणे ब्रिटन थांबवणार नाही’
विहीरीमध्ये पाणी नव्हतं. शिवाय शेण आणि अन्य टाकाऊ पदार्थ विरीत टाकल्यामुळे ते साचून विहिरीत विषारी बायोगॅस तयार झाला होता. त्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी ही घटना घडली. बुधवारी पहाटेच्या सुमारास पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. प्रशासनाकडे यंत्रणा नसल्याने मदतकार्य उशिराने सुरु झालं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एकजण बचावला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.