27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषबाप्पाच्या विसर्जनासाठी गेलेले पाच बुडाले! दोघांना वाचविले

बाप्पाच्या विसर्जनासाठी गेलेले पाच बुडाले! दोघांना वाचविले

Google News Follow

Related

रविवारी (१९ सप्टेंबर) मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात बाप्पाचे विसर्जन झाले. मुंबईतील एका घटनेमुळे या उत्साहाला गालबोट लागले. मुंबईतील वर्सोवा बीच येथे गणेश विसर्जनादरम्यान समुद्रात पाच मुले बुडाली असून त्यातील दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर तीन मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही. बीचवर तैनात असलेले लाइफ गार्ड्स या मुलांचा शोध घेत आहेत. रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास वर्सोवा गाव येथील पाटील गल्ली नं. २ येथे समुद्रात ही दुर्घटना घडली.

वर्सोवा गाव येथे समुद्रात विसर्जनादरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने ही पाच मुले समुद्रात बुडाली. त्यावेळी तिथे तैनात असलेल्या लाइफ गार्ड्सनी प्रसंगावधान दाखवत तातडीने शोधमोहीम सुरू करत दोन मुलांना वाचवण्यात यश मिळवले आहे, तर तीन मुलांचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. रात्री ९ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून अद्याप शोधमोहीम सुरू आहे, अशी माहिती लाइफ गार्ड विजय फोका यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली असून इतर मुलांबाबत अद्याप अधिक तपशील मिळू शकलेला नाही.

हे ही वाचा:

उल्हासनगर कायदा-सुव्यवस्थेच्या नावाने उल्हास…घडली आणखी एक घटना!

लालपरीचे उत्पन्न १२ कोटी, खर्च २५ कोटी

ड्रोन्स सरकारने आखली ‘ही’ मोठी योजना

गडहिंग्लजसाखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी १०० ​कोटींचा घोटाळा केला

कोरोना नियमांमुळे यंदा गणेशोत्सवासाठी आणि गणेश विसर्जनासाठी अनेक नियमांचे बंधन घालण्यात आले होते. नियमांच्या चौकटीत राहून गर्दी टाळत यंदा विसर्जन पार पडले. रविवारी मुंबईतील समुद्र किनारी आणि विसर्जनाच्या इतर ठिकाणी भाविकांचा उत्साह दिसून येत होता. मुंबईत उत्साहात आणि नियमांचे पालन करून विसर्जन सुरू असतानाच वर्सोवा येथील दुर्घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईत रात्री ९ वाजेपर्यंत १ हजार ९१० सार्वजनिक, तर १७ हजार ६२३ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले असून कृत्रिम तलावात ७१० सार्वजनिक व ७ हजार ७६१ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. वर्सोवा येथील घटना वगळता मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडलेला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा