मुंबईतील वांद्रे- वरळी सी लिंकवर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार गाड्या आणि एक रुग्णवाहिका एकमेकांवर आदळल्या. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सी- लिंकवर एका कारचा अपघात झाला होता. यावेळी जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहोचली होती. पण दरम्यान तेथून जाणाऱ्या तीन गाड्यांनी अपघातग्रस्त वाहनासह रुग्णवाहिकेला धडक दिली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अपघातामध्ये १३ जण जखमी झाले होते. त्यापैकी १० जखमींना बांद्रा ०१ मोबाईल व वरळी ०१ मोबाईलच्या मदतीने उपचाराकरिता नायर रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी पाच जणांना मृत घोषित केले. तर दोन पुरुष आणि एका महिलेला उपचाराकरिता दाखल करून घेण्यात आले आहे. तर दोन किरकोळ जखमींना उपचार करून त्यांच्या नातेवाईकांसोबत घरी सोडण्यात आले आहे.
हे ही वाचा
दुसऱ्या महायुद्धाच्या ८३ वर्षांनंतर पोलंडची जर्मनीकडे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी
२४ वर्षांनंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्या तरुणीला फटकारले
दुर्दैवी!! गरबा खेळताना मुलगा गेला पाठोपाठ वडीलही मृत्युमुखी
रेल्वेमध्ये तिकीट तपासणीसाची नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
तसेच सिलिंक सिक्युरिटीचा एक कर्मचारी व इतर दोन जण जखमी झाल्याने त्यांना खाजगी वाहनातून लीलावती रुग्णालय, सैफी रूग्णालय व ग्लोबल रूग्णालय येथे उपचाराकरीता नेण्यात आले आहे. पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.